Monday, July 23, 2012

परीराणी

परीराणी परीराणी ---  का गं तुझ्या डोळा पाणी
पिंजलेल्या धुक्यातून --- का गं तुझी उदास कहाणी?


परीराणी परीराणी--- तुझा झगा कसा फाटला
जादूच्या छडीवरचा --- तारा कसा तुटला?


परीराणी परीराणी--- का गं तुझी मूक वाणी
चांदण्यात भिजलेली --- गेली कुठे तुझी गाणी?


परीराणी परीराणी--- तुझे पंख कुठे गेले
आकाशाला वेढणारे --- तुझे स्वप्नं कुठे गेले?


परीराणी परीराणी--- तुझे रंग का गं उडून गेले
परीराणी परीराणी--- तू लग्न का गं केले?
====================
अभिजित अत्रे

7 comments:

Mihir... said...

Parirani..shevatchi line khup kahi sangun jate.....

SUBHASH said...

Parirani...sagalya mulinchi swapne ashich waryawar wirun jataat..! Kaay he !
Tujhi kavita vichar karayalaa lawanaari aahe!

- Subhash Naik.

atre-uvach said...

Thanks Mihir. The last line is an answer to all questions raised earlier in the poem. Pari-Rani symbolises an innocent girl who was once full of life and energy, but whose dreams were shattered because of a bad marriage. Though this not a general phenomena and woman do happily live with their ‘most obedient’ husbands (like us!), have seen many cases wherein a bad marriage has ruined the aspirations of the girl. Va Pu Kale has written a fantastic short story book on this topic, titled “TAPTA-PADI”, worth reading. This poem is it’s abridged version.

Sukrut Karandikar said...

'काग'...प्रत्येकवेळी खटकते. त्याऐवजी 'का गं' वाचायला आवडले असते. शेवटची ओळ वाचेपर्यंत बालगीत वाटले. शेवटच्या ओळीत परी एकदम विवाहीत झाली आणि सगळेच संदर्भ बदलले. छान.

Sukrut Karandikar said...

'काग'...प्रत्येकवेळी खटकते. त्याऐवजी 'का गं' वाचायला आवडले असते. शेवटची ओळ वाचेपर्यंत बालगीत वाटले. शेवटच्या ओळीत परी एकदम विवाहीत झाली आणि सगळेच संदर्भ बदलले. छान.

aativas said...

शेवटच्या ओळीने नवा संदर्भ दिला. वरती सुकृत करंदीकर यांनी सुचवल्याप्रमाणे 'काग' याऐवजी 'का गं' असा शब्दप्रयोग करावा.

atre-uvach said...

Thanks Sukrut and Aativas. have made the correction in 'का गं' as suggested. do point out the corrections they are most welcome.
regs
abhijit atre