Saturday, April 24, 2010

सूर्य

खोल खोल दरीतील काताळावर
बसले होते काही कवि काजवे
चर्चा करीत होते मिळालेल्या टाळ्यांची
आणि न मिळालेल्या राज्य पुरस्कारांची

मीही झालो त्यात सामील
आणखी एक काजवा होऊन
आमच्यात झाले काही गट
पडले काही वैचारिक तट

माझ्या गटातल्या एकाला
दुसरा "'यमक्या" म्हणाला
आणि सुरु झाले भांडण
एक न संपणारे कांडण

अंधार बुडल्या दरीत
जेव्हा मिटले आमचे प्रकाश
त्येव्हा तो आला
त्याच्या सात घोड्यांवरून उतरून
मनुष्यरुपात.

"तुम्ही कुठे होता?
आमचे प्रकाश संपले ना?," आम्ही
"मी इथेच होतो मित्रानो
तुम्ही माझे बोट सोडलेत" तो म्हणाला.

"भांडू नका बाळानो
अजून दरी पार करायची आहे
मग डोंगर, मग हिमालय
मग जमले तर आकाश
खूप सूर्य आहेत तिथे
माझ्याहून ही मोठे
तुमच्या देहू आळंदी इतके जुने
थोडे त्यांच्याकडे पहायाला शिका
इतके नका आत्ममग्न होऊ,"

एवढे सांगून तो उठला
एक अग्निगोल होउन् झेपावला
त्याचा रथ आकाशगंगेवर स्वार होताना
सोनेरी तेजाचे काही पुंजके सांडले दरीत
आणि उडाली एक झुंबड
ते कवडसे गोळा करण्यासाठी
पुन्हा प्रकाशित होण्यासाठी
स्वयंप्रकाशित म्हणून मिरवण्यासाठी

त्यातलेच काही सूर्यकिरण वेचताना
मी सहज वर पहिले
माझ्या काजव्याच्या डोळ्यांनी
तेव्हा त्त्या तप्त लोहगोलावर
कोरलेली दिसली
पाच अक्षरे
कु ... सु.. ... मा.... ग्र.... ज
=============
अभिजित अत्रे
================

Thursday, April 1, 2010

डोह

मित्रानो,
तुमचा प्रेमभंग झाला नसेल कदाचित पण आयुष्यात एका रस्त्याने जायचे ठरवल्यावर दुसरा रस्ता चालायचे राहून जाणे कुणाला टळलय? आणि, स्वप्ने तरी किती? प्रत्येक मुठीत येतेच असे नाही. गालिबची मला खूप आवडणारी एक कविता आहे. "हजारो ख्वाइशे है ऐसी कि हर ख्वाईश पे दम निकले". बघा तुमच्याही मनात असाच एक डोह आहे का? नसेल तर एप्रिल फूल समजा!
=================
डोह
एक डोह आहे
माझ्या मनात खोल खोल दडलेला
आमावस्य गूढतेत रुतलेला
पाझरणाऱ्या अंधाराने भरलेला
काळाच्या पडद्याआड पुरलेला

तसा मी तिथे फारसा नाही जात
नाही आता बसत
पुर्वसंचीताचे ओझे कुरवाळत
रमलेला असतो संसारात
आणि गर्दीतच असतो सतत

पण कधी कधी
जेव्हा खूप खूप एकटा असतो
तेव्हा जाऊन बसतो
त्या डोहाच्या काठावर
अलिप्ततेच्या काठीने सारतो दूर
साचलेले काळाचे दाट शेवाळे
आणि पाहतो आत वाकून

पायथ्याशी पडलेली असतात
काही चुरगळलेली स्वप्ने
काही न चाललेल्या वाटा

काही दुरावलेले चेहरे
काही पोस्ट न केलेली पत्र
काही पचवलेले नाकार
काही टाळलेले स्वीकार
काही अर्धवट टाकलेले डाव

काही हुकलेल्या संधी
काही हरवलेली नाती
काही गिळलेले अपमान

काही उपकारकर्त्याचे राहून गेलेले मानायचे आभार
कुणालातरी द्यायाच्या राहिलेल्या काही शिव्या
आणि हो, एकाचा न केलेला खूनसुद्धा!

बेल वाजते
अन मी घाईघाई ने उठतो
पुन्हा पसरवतो
काळाचे ते घट्ट शेवाळे
डोहावर.

दरवाजात उभा असतो मित्र
"उशीर केलास दार उघडायला?"
मी लपवत नाही
सांगतो त्याला माझ्या
डोहाची कथा

तो हसतो. म्हणतो:
माझ्याही मनात आहे असाच एक डोह
हातातून निसटलेल्या क्षणांनी भरलेला

मी ही मांडतो कधीतरी
होकार- नाकारांचा ताळेबंद
करतो बेरीज वजाबाकी
न चालेल्या वाटांनी गेलो असतो
तर कदाचित होऊ शकलेल्या फायद्याची
आणि तसेच न झालेल्या तोट्याची.

असाच एक डोह असेल
खोल खोल दडलेला
माझ्या, तुझ्या, सर्वांच्या
अगदी
तिच्याही मनात

जगत असतात माणसे
घेऊन एक जखम भळाळणारी
इतरांना न दिसणारी
ज्याची त्याला जाणवणारी
वाहत असते ती अखंड
काळाच्या जाड कातडीखाली
वेदनाहीन होऊन
अंधाऱ्या डोहात विरघळून
तसे आपण सारेच
अश्वथामा!.
=======
अभिजित अत्रे
===========

Thursday, March 25, 2010

मला जाऊद्या ना घरी - आता वाजले की बारा

==========================
चांदीचे ताट मांडलेले आहे. ताटा भोवती सुंदर रांगोळी आहे. देवासमोर लावलेल्या धुपाचा मोहित करणारा सुगंध खोलीभर दरवळतोय. बिस्मिल्लांच्या सनईच्या सुरांनी घरातले वातावरण मंगलमय झाले आहे. चारीबाजूने प्रसन्नतेचा शिडकावा होतो आहे. साक्षात अन्नपूर्णा वाढायला उभी आहे. भोजन सुग्रास आहे. भूक ही लागली आहे. पण घशाखाली एकही घास जात नाहियय.

अहो जेवायला कुठून सुरवात करायची हेंच कळेनासे झाले आहे. ताटाच्या आत व बाहेर वाट्यांची चळत आहे. पंच नव्हे तर पन्नास पक्वाने आहेत. गुलाबजामच्या शेजारी रसमलई व रसगुल्ला आहे. श्रीखंडाच्या जोडीला आम्रखंड व कलाकंद आहे. बसुंदीच्या शेजारी शेवयाची खीर आणि सीताफळ रबडी आहे. गाजर हलवा, मुग हलवा, दुधी हलवा आणि जोडीला जिलेबी आहे. पुरणपोळी, गुळपोळी आणि खावा पोळी वाढून झाली आहे आणि अन्नपूर्णा विचारीत आहे " काय आणायचे?"

काय सांगावे ? काय खावे? किती खावे? मी बावचळून गेलो आहे.
सध्या पुणेकर मराठी रसिकांची अवस्था कहीशी अशीच आहे.

पुणे तिथे काय उणे? हे मान्य. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, हे ही तितकेच खरे. पण गेले दोन अडीच महिने पुण्याच्या मराठी रसिकांवर सांस्कृतिक कार्यक्रमांचा भडीमार होतो आहे. विएंतनामवर जसा बॉम्ब आणि गोळ्यांचा हल्ला होत होता तसा पुण्यात गेले दोन महिने सांस्कृतिक कार्यक्रमांचा हल्लाबोल चालू आहे. एक चांगला कार्यक्रम झाला नाही कि लगेच दुसरा. एक चांगला सिनेमा बघून होत नाही तर दुसरा त्याहूनही चांगला. जरा उसंत नाही. जर्मन बकेरीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या काळातही हे सांस्कृतिक अग्निहोत्र चालूच होते.

पुण्यात आलेल्या स्वाईन फ्लूच्या साथीने पुण्याच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेची पार वाट लावली आहे. सुरवात झाली ती सवाई गंधर्व मोह्त्सावापासून. एरवी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होणारा हा संगीत जलसा. याला काही जण वधू-वर सोहळा असेही म्हणतात. वाघ-सिंह हे जसे रात्री सुळे आणि नख्या पराजत शिकारीला बाहेर पडतात तसे शास्त्रीय संगीतातले काहीही कळत नसणारी अनेक उपवर मुले-मुली रात्री शाल पांघरून इथे जमतात. आपला जोडा कुणाशी जुळतोय याचा शोध घेतात.

जरा विषयांतर होईल (ब्लॉग आपलाच आहे त्यामुळे तुम्ही माफ करालच) पण एक घडलेला किस्सा सांगतो. मागे एकदा सवाईतील बटाटावड्याच्या गाडीपाशी मी सिगरेट ओढत उभा असताना त्याच गाडीपाशी एका होऊ घातलेल्या जोडप्याच्या सवाई गप्पा कानावर आल्या.
तो:  छान झाले ना गाणे.  भैरवी म्हणजे पंडितजींचा हातचा मळ. किराणा घराण्याचे हे वैशिष्ट्यच.
(मुर्खा कार्यक्रमाचे हे पहिले गाणे आहे. भैरवी कशी असेल. आईला कधी किराणाच्या दुकानातून साधे पोहे आणून दिले नाहीस तू आणि घराण्याची वैशिष्ठ सांगतोयस. गेली तुझी विकेट-- मी मनात).
पण विकेट जात नाही. त्याच्या शालीच्या झिरमिळ्यात बोटे गुंफून
ती: " राजा. आपल्या प्रेमाची सुरवात अशीच भैरवीने होईल ना रे? (भैरवीने सुरवात? बोंबला.. मी मनात.)
पण दोघांनाही गाणे कळत नसल्याने त्यांचे सूर छान जमले. अशा 'शालीन' लग्नांना मी तेव्हापासून 'शालजोडीतील लग्न' किवा 'सवाई लग्न' असे संबोधतो.

असो. विषयांतर पुरे. सवाईवर एक वेगळा लेख लिहिता येईल. सांगायचं मुद्दा कि स्वाईनफ्लू मुळे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होणारा सवाई जानेवारीत घेण्यात आला आणि त्यांनंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक झंझावाताच पुण्यात सुरु झाला. तो अजून चालूच आहे. सर्व कार्यक्रम दर्जेदार. नाव ठेवायला जागा नाही. सवाई संपत नाही कि राहुल देशपांडे- कम-नाना पाटेकरांचा वसंतोत्सव. त्यात आजोबांची कट्यार नातू पहिल्यांदा चालवणार म्हटल्यावर हा कार्यक्रम चुकवून कसे चालणार?
मग अंतर्नाद, अजय अतुल, रवी शंकर, झाकीर हुसैन, फिल्म फेस्टिवल, शनिवारवाडा नृत्य मोहोत्सव , सोलो जसराज, आर्या आंबेकर आणि बालचमू, शिवकुमार शर्मा, आणि...... ही यादी संपणारी नाही.
यातले निम्म्याहून जास्त कार्यक्रम आमच्या आणि पुण्यातील इतर वृतपत्रानी आयोजित केलेले. हल्ली वृतपत्रांचा मुख्य धंदा पेपर काढणे नसून इव्हेट मॅनेज्मेंट आहे कि काय अशी शंका येते.

हे कमी होते कि काय म्हणून याच काळात अनेक दर्जेदार मराठी सिनेमे झळकले. गाभ्रीचा पाऊस, हरीश्चान्द्राची फॅक्टरी, नटरंग, रिंगा रिंगा, जोगवा आणि काही पा सारखे हिंदी ही. त्यात लिमयेना राष्ट्रीय पुरस्कार. त्याचा सत्कार. एफटीआयची पन्नास वर्षे. प्रमुख पाहुणा देवानंद. ( तो परत रात्री माझ्या ऑफिस मध्ये गप्पा मारायलाही आला होता. सत्त्यांशिव्या वर्षीही सडपातळ. नाहीतर आम्ही. फुटबॉल. हस्तोलंदन करतानाही लाज वाटली स्वता:ची). आमचे आवडते दिग्दर्शक-कम-पोलीस इन्स्पेक्टर सतीश राजवाडे यांचा नाशिकच्या वाड्यात रोज नवीन धुमाकूळ चालूच आहे. अग्निहोत्रासारखा अखंड.

असो. हे सर्व कार्यक्रम आणि सिनेमे पाहता पाहता खऱ्या पुणेकर रसिकांचा खिसा पार रिकामा झालाय. अनेक कामे खोळंबलीत. त्यात परत मार्च महिना. हा महिना सुरु होण्याआधीच माझ्यासह अनेक पगारदार रसिकांचा खिसा साफ झालेला असतो. आता तरी हा सांस्कृतिक हल्ला थांबेल अशी अपेक्षा रसिक करत होते. पण तसे होणे नाही. उद्यापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चालू होतंय.

आपल्या सर्वांचे मित्र आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलवून जेवणाबरोबर आग्रहाने निमंत्रण दिले आहे. तरी काही जणांना राग आहे कि घरी येवून आमंत्रण का दिले नाही. साहित्यिक सुद्धा कधी कधी अतीच करतात. तुम्ही काय अमिताभ बच्चन आहात का सचिन तेंडूलकर, घरी येवून निमंत्रण द्यायला? या सगळ्या टीका- खुलाशात इतका वेळ वाया गेला कि चियर गर्ल्सना संमेलनास आणायचे राहून गेले. पुणेकर रसिक खरेच एका अभिनव कार्यक्रमास मुकले.

कल्पना करा. कवी कट्ट्यावर काही कवी त्यांच्या कवितेचे काही स्वप्नील शेर म्हणतायत आणि प्रत्येक शेर झाल्यावर चियर गर्ल्स नाचत आहेत. संमेलनाला एक नवी दिशा मिळाली असती. पेपरवाल्यांचे काही कळत नाही. नवीन काही केले कि म्हणायचे हे प्रथेला धरून नाही आणि प्रथेप्रमाणे कार्यक्रम ठरवले की म्हणायचे '' तेच ते आणि तेच ते".

"तरी तुम्हाला विचारले होते. सल्ला मागितला होता कि काय कार्यक्रम ठेवू. तेव्हा नाही हा ब्लॉग साहित्य विषय आठवला," एक आयोजक मला उद्विग्न होऊन सांगत होते. नाही कळत आम्हाला. (चला कबूल करत आहेत हे ही नसे थोडके.)

संमेलन चांगले पार पडो. अहो शेवटी आपल्या पुण्यात होते आहे. फार वस्त्रहरण केले तर आपल्याच शहराची अब्रू जायची. फार नका खोदू राव, आता दिली आहेत ना सूत्र त्यांच्याकडे. पुण्यात नदीकाठच्या एका रस्त्याचे टेंडर २०० कोटीच्या वर गेले आहे. सरस्वतीच्या बाजारात लक्ष्मी फिरून फिरून किती फिरणार? एखादी पेटी इकडे तिकडे. जरा दुर्लक्ष करा राव.

तर मित्रानो आमचे पुढचे तीन दिवस संमेलनात जाणार आहेत. पण माझ्याच नाही तर अनेक पुणेकर रसिकांच्या मनात प्रश्न आहे " घरी काय सांगायचे?" . गेले दोन महिने हे असेच चालू आहे. रोज एक नवा कार्यक्रम, रोज नवा सिनेमा. संमेलनानंतर तरी हे काही काळ थांबेल ना?

हे सर्व कार्यक्रम दर्जेदार आहेत यात काही शंका नाही. नवीन मराठी सिनेमाही पूर्वीच्या तमाशाप्रधान सिनेमांपेक्षा खूप खूप वेगळा आणि अदभूत अनुभव देतो आहे. संमेलनही चांगलेच होईल.
पण त्यानंतर तरी हा सांस्कृतिक भडीमार काही काळ थांबवा. अहो, एखादी चांगली गोष्ट आणि सौदर्य उपभोगायालाही वेळ हवा. भोजन कितीही सुग्रास असले तरी अपचन झाल्यावर काय खाणार?

दर्जेदार कार्यक्रमांची ऐश्वर्या रोज रात्रीच पुणेकर रसिकांना खुणावते आहे. हात धरून बैठकीला बसण्याचे निमंत्रण देते आहे. पण कातावलेला पुणेकर रसिक तिचा नाजूक हात आता बाजूला करतोय आणि अजीजीने म्हणतोय : "मला जाऊद्या ना घरी.... आता वाजले की बारा,".
===============
अभिजित अत्रे
=====

Monday, March 22, 2010

नवक्रांतीचे गाणे

पैशाकडे पाठ फिरवून कष्टकरयांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या
समाजातील खऱ्या श्रीमंत मत्रांसाठी आणि पोलिसांनी केलेले बलात्कार, बांधकाम व्यावसायिक व पुढारी यांचे साटेलोटे, शेतकऱ्यांचे हाल आणि शिक्षणसम्राटांच्या पदरी बांधलेल्या विद्वानांकडे पाहून ज्यांचे मन उद्वेगाने भरते त्या माझ्या समविचारी मराठी पत्रकार मित्रांनसाठी हे एक नवेकोरे "नवक्रांतीचे गाणे". 
प्रतिक्रिया तर द्याच पण जमले तर एक चाल ही द्या.
=====================
नवक्रांतीचे गाणे
===========
पिचणाऱ्या मनगटाच्या
मुठी आता वळू दे
गोठणाऱ्या नसा नसातून
आता वीज वाहू दे || धृ ||  

उन्मत्त फार झाले
राजाचे हे शिपाई
कोवळ्या कळीस डसले
हे शिशुपाल, हे कसाई
यांच्या पापाचा घडा आता भरू दे
वचन आता मोडू दे, आता सुदर्शन सुटू दे || 
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ ||

प्रल्हादाच्या शिवाराचे
तुटले बान्ध कारे
इमले इमारतींचे
रक्षिती हिरण्यकश्यपू सारे
खांबा खांबाना येथल्या आता तडा जाऊ दे
उंबरठे आता माखू दे, आता नृसिंह प्रकटू दे ||
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ ||  

दबा धरून बसल्या आहेत
अजुनी झुंडी गिधाडांच्या
महाराष्ट्राला लुटत आहेत
फौजा दिल्लीतील यवनांच्या
सह्याद्रीच्या कड्याकपारीतून आता वादळ धुमसू दे
आता शिवबाची भवानी पुन्हा तळपू दे || 
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ||  

शिल्लक ना चार नाणी
आणि घरी मुलीचे कार्य
विहिरीत नाही पाणी
अणि झारीत शुक्राचार्य
माझ्या या शेतकरयचे हे दैन्य आता संपू दे
आता बलरामासवे कुबेर नांगर धरू दे ||
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ || 

शिक्षणसम्राटांची फिरते इथे टोळी
दारात आर्यभट्ट, घेउन उभे झोळी
लाचार पंडित हे, करतात आता दलाली
यांनी सरस्वतीचीही लावली इथे बोली
आता या अभिमत द्वारका बुडू दे
सांदीपनीच्या आश्रमात पुन्हा सुदामा शिकू दे ||  
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ ||

कैदेत रावणाच्या का
आहेत अजुनी सीता
जळणार कश्या या लंका
हनुमान पहारा देता
आता प्रत्यन्च्यावर ब्रम्हास्त्र चढू दे
वनवास आता संपू दे, आता राम जिंकू दे
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ || 

आजचे हे राज्य कलीचे
उद्या टिकणार नाही
सूर्य येथल्या तरुणाईचे
अंधारात बुडणार नाही
कष्टकऱ्यांच्या अंगारातून विष्णू अवतरू दे
युद्ध आता होऊ दे, आता रक्त सांडू दे||  
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ||  
===========
अभिजित अत्रे
=========

Wednesday, March 17, 2010

कविता:-- ते चार मृत्यू

ते चार मृत्यू 
===============
ठरवले होते मेल्यावर
एकदा बसायचे चित्रगुप्ताबरोबर
चाळायची त्याची चोपडी
सोडवायची ती कोडी
मृत्यूची.

ते चार मृत्यू
मनास सतत सलणारे
डोक्यात पिंगा घालणारे
तर्क वितर्क जाळणारे
प्रश्नचिन्हातच उरणारे
ते चार मृत्यू

ठरवले होते
विचारायचे त्याला

असा कसा तो धुमसला वारा
आभाळातून ढळला तारा
खरेच का ते विमान पडले
का आझाद साधू बनून दडले?

ठरवले होते
विचारायचे त्याला

का झोकाळाला आसमंत सारा
विझला कसा जय जवान जय किसानचा नारा
खरेच हृदयाचा ठोका बंद झाला
का ताश्कंदमध्ये होता विषाचा पेला?

ठरवले होते
विचारायचे त्याला

का टाकली फुलराणीने उडी
का थांबली नाही ती आगीनगाडी
कशी तुडवलीस रूळावरती तू तरी
हरिततृणांची मखमल सारी?


ठरवले होते
विचारायचे त्याला

असे कसे धजावले गुरुजींचे मन
का घेतले त्यांनी मृत्यूचे महाचुंबन
किती साधना अन राष्ट्रभाषा
मग कोणती होती निराशा ?


ठरवले होते
विचारायचे त्याला
पण नाही विचारणार आता

अनेक सुभाषचंद्र कोसळलेत
मिग विमानांच्या शवपेटीत
काळाच्या खोल खोल गर्तेत

लालबहादूर शास्त्रींच्या मागे चाललेत
शेतकऱ्यांचे तांडे, भांबावलेले
मरूनसुद्धा पाशात लटकलेले

निशब्द झाली आहेत बडबडगीते
भारत इंग्लिशस्कूलच्या सहलीची (*)
फुरसुंगीच्या रुळांवर विखुरलीत
पाने बालकवींच्या कवितेची

आणि या साने गुरुजींच्या भूमीत
हे झाले आहे रोजचे
एक श्याम आईचे बोट सोडतोय, कायमचे

ठरवले होते
विचारायचे त्याला
पण नाही विचारणार आता
चित्रगुप्ता
मी तरी किती किती कहाण्या ऐकणार
आणि तू तरी काय काय लिहून ठेवणार
========
अभिजित अत्रे
============

(*):-- साधारण पंधरा वर्षापूर्वी फुरसुंगीच्या रेल्वेफटकातून जाताना शिवाजीनगरच्या भारत इंग्लिशस्कूलची सहलीवरून परतणारी एक बस रुळावर फसली. भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने ही बस उडवली. पाचावी सहावीच्या मुलांची सत्तावीस किवा जास्तच प्रेते मी त्या दिवशी पहिली. आठवले कि अजून अंगावर काटा येतो. पिवळे तांबूस उन कोवळे म्हणणरे, फुराणीला जोजवणारे बालकवीही वयाच्या २८व्या वर्षी असेच रेल्वेखाली पडून गेले. ती आत्महत्या होती कि अपघात हे मराठी कवितेला कधीही न सुटनारे कोडे.
===========

गम्मत गाणी (भाग -- २)

गम्मत गाणी गम्मत गाणी
थोडी बासरी बाकी पिपाणी
नाही बट्टा, थोडी थट्टा
थोडी मस्करी, नाही कुस्करी
गम्मत गाणी गम्मत गाणी
थोडी बासरी बाकी पिपाणी
(भाग -२ )
=======================
मंडई ते अनिल पानवाला
बंद झाले कट्टे
ओंस पडले पार
लग्नानंतरही का सोसवेना
यांना जागरणाचा भार?

स्वारगेटची भेळ
आणि ऑफिसची वेळ
याचा म्हणे आता
जमत नाही मेळ

पाव सॅंपलने  म्हणे आता
असिडिटी होते फार
खिमापाव ही आता
यांना तिखट लागतो यार

भेटले कि लगेच यांना
घरी जाण्याची घाई
म्हणतात उशीर झालाकी
दार उघडत नाही बाई

चाळिशी झाली तरी
बायकोची वाटते भीती
रिंग वाजली की
पळापळ होते किती

याची वाढलीय शुगर
त्याची बिघडली फिगर
कारणे काही संपत नाहीत
मैत्रीची राहिली ना  कदर

मंडईच्या काट्यावर
भरायची एक शाळा
पुण्यातील अफवांचा
पिकायचा तिथे मळा

जेव्हापासून बंद झाला
खन्नांचा तो रात्रीचा चहा
डेक्कनचा अनिल घेतो
पूना मसाल्याचे दहा!
====
प्रेस ते बँक: इकच दुख:
पेरलेल्या रोपाचे        
झाले मोठे झाड
गड्या तरी सांगितलेले    
वेळेवर पाड
'अलर्ट' नाही राहिले    
त्यांची बंद झाली फाइल
अनेकांच्या चेहऱ्यावरचे        
आज लोपले 'स्माइल' !
=====

अध्यक्ष
संघाचा तो प्रतिष्ठित वस्तरा
त्याने आवरला आपला बिस्तरा
त्याला म्हणाली एक उजेड कात्री
काय येणारका  निवडणूकीच्या रात्री
देते अध्यक्षपदाची खात्री
नको म्हणाला वस्तरा
आता तुमचे तुम्हीच निस्तरा
======

कसब्याचा गडकरी
कसब्याचा किल्लेदार
मोठा हुशार
गडाकडेला बसून
चाकुला लावतो धार
विरोधकांनी जेव्हा पत्करला
'बाळा-टू' बनण्याचा विडा
नारायणपेठेच्या सरदाराने
जवळ केला राजवाडा
=======

दारूचे  पुणे
दारूवाला पूल ते बाटलीवाला गार्डन
हा रस्ता नसे थेट
माडीवाले कॉलोनीतून
दिसेल कसे क्वॉर्टरगेट?
सभ्य सुसंस्कृत पुणेकरांना
चालतो ताडीवाला रोड
मला मात्र सांगतात
आता दारू सोड 
=====
अभिजित अत्रे
========

Saturday, March 13, 2010

गम्मत गाणी (भाग--१)

मित्रानो,

हा आहे एंक (अ)काव्य प्रयोग.
थोडी कविता आणि थोडी गम्मत.
मिसळ हो.
बघा आवडते का.
आणखी एंक.
यात कुणाची टिंगल नाही.
हि आहेत गम्मतगाणी.
वाचा आणि विसरा. 
आमचे एंक पुण्याचे श्रीमंत मित्र आहेत. रोज ते नवा नवा कोट घालतात.
रोज एंक पार्टी. रोज नवा कोट. पण, आतला सदरा तोच.
त्यांच्यावरचे हे पहिले गम्मतगाणे.

वैधानिक सूचना: इतरकोणाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!.
======================================
गम्मत गाणी गम्मत गाणी
थोडी बासरी बाकी पिपाणी
नाही बट्टा, थोडी थट्टा
थोडी मस्करी, नाही कुस्करी
गम्मत गाणी गम्मत गाणी
थोडी बासरी बाकी पिपाणी
==============
गाणे पहिले:
===============
खरा कर्ण
झर झर झरल्या श्रावणधारा
टप टप पडल्या मोतियाच्या गारा
चिंब चिंब आसमंत सारा


तरीही याचा तोच सदरा !


धुंध धुंध करी मृदुगंधित वारा
गर्जत गर्जत बरसती जलधारा
नाच नाचती मोर लेवून नवा पिसारा


तरीही याचा तोच सदरा !


भिरभिर भिरभिर फिरला वारा
सरसर सरसर चढला पारा
चिकचिक चिकचिक घामाच्या धारा


तरीही याचा तोच सदरा !


देवही आज खजील जरा
म्हणती आमचे चुकलेच जरा
कर्णापेक्षा याने बरा


सांभाळला असता कवचकुंडलांचा भारा!


आली नसेल का आज बाई ?
का झाली असेल खूप घाई ?
वाशिंगमशीनचा का उडाला फ्युज़ ?
का हा होता खूप कंनफ्युज़ ?


सुटता सुटेना हे कोडे
गुपित हे सोडवना गडे
प्रश्नाचे हो पडती सडे
खंडोबाला घातले साकडे


एके दिवशी झाला येळकोट
उत्तर सापडले सरळसोट
मिळतो याला रोज नवानवा कोट
का बदलेल मग तो बुशकोट !
=============
अभिजित अत्रे
=============

Tuesday, March 2, 2010

अत्रे म्हणे: अप्रेझलचे अभंग शो(श्लो)क

रीसेशन आले | सेन्सेक्स पडले
राजू घरी गेले | शिक्षामात्र मला || १||

पगार कापला | भत्ताहि छाटला
करहि वाढला |  अपरीमित || २||

चाले हप्त्यांचा नांगर |  वाढे कर्जाचा डोंगर
मित्रहि उधार |  देईनात || ३||

काळोख दाटे |  खिसा माझा फाटे
महिना वाटे  |  खूप मोठा || ४ ||

मालक भुंकती | जमा खर्च मांडती
पिंकस्लीपची भीती |  सदोदित || ५||

वर्ष आले-गेले | चैतन्य लोपले
ब्यालंस संपले | बँकेतले || ६||  

तरी केले काम |  घाळला घाम
मुखातही राम | ठेवियला || ७||

अंगी नाना कळा | पण धाडसनाही बाळा
पुन्हा मालकाचाच मळा | फुलवला || ८||  

शेअर वाढले |  अप्रेझल आले
मोर नाचले |  मनी थुईथुई || ९||

देवाला साखर |  साहेबाला मखर
कामाची पाखर |  परि वायागेली || १०||

बंगाली लॉबी |  मल्लू बॉबी
मराठी डाळ-कोबी | इथे शिजेचनां || ११ ||

दाखवली तळमळ | केली पळापळ
तरी माझा परिमळ |  दरवळेचनां || १२||


आधीच जो वेलपेड |  त्यालाच वरची ग्रेड
आमची तडफड  | जाणवेचना || १३ ||

अत्रे म्हणे आता:--

काढू नको गळा | कोणा न कळवळा
नोकरी कैवल्यसोहळा | समज आता || १४||

जाळ मोहाची लंका |  वाजव परमार्थाचा डंका
भवितव्याची शंका | धरू नको || १५||

ज्याने दिली चोच |  तोच देईल रे चारा
विठ्ठलावर भार सारा |  टाक आता || १६ ||  
====================
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
=========
पुणेकर बुवा तळटीप लिहित नाहीत. पाटी लिहितात. पुण्याबाहेरील वाचकांसाठी हि पुणेरी पाटी:
"टाक आता" हा जरी सर्व दुखण्यान्वरचा जालीम व अक्सीर इलाज असला तरी त्याला प्रायोजक लागतो. नाहीतर आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास अशी अवस्था व्हायची. प्रायोजक नसल्यास या शब्दाचा वेगळा अर्थ काढू नये. आधीच्या ओळीशी जुळवून वाचा-- अत्रे म्हणे)
=======


Thursday, February 25, 2010

Tendulkar and my bread

It seems that there is no dearth of cynical people in our country. I am appalled by the long chats and messages which have flooded the home page of my facebook this afternoon, deliberating and questioning the greatness of Sachin Tendulkar’s double ton at Gwalior yesterday.

There is a possibility that many of you may have already seen these “intellectual exchanges” as those who participated are our common friends. But for those uninitiated let me tell the gist.

While the world is celebrating Sachin Tendulkar’s double ton, the first man to do so in the history of cricket, these intellectuals are trying to drive home the often repeated point that we Indians are idol worshipers. Instead of saluting ‘Sach’ a towering performance they have raised two new objections over the master blaster’s golden innings.

Here is the first one:
“Sachin was agitated when Dhoni was scoring runs for the team and this establishes that he was playing for his personal record,”:
Now, that’s typical of these hypocrites. Tendulkar’s 200 effort was for self and the 60 odd runs by Dhoni were for the team? How?.

Sadly, this is not for the first time that I have heard this absurd argument. In the past too whenever Tendulkar had it big, I have heard them saying: “It was not in the second innings” ; “ It was in Asian sub continent,” “This was the first one away but the bowling attack was weak,” “ Pata wicket hoti re”. . etc etc

There is a tribe which takes pleasure in antagonising our heroes. They do it with a deliberate purpose. Firstly, it helps them to stand out, people look at them in awe..hey here is someone who is talking something different than the lesser mortals.

I had thought that Tendulkar’s 200 has silenced these critics once for all. It was not to happen. They still feel that Tendulkar looked agitated while Dhoni was scoring and that he desperately wanted strike for carving a yet another personal record.

To me Tendulkar never looked agitated. Tendulkar was as clam as a champion should be. It is another matter that thousands of his fans were agitated since Dhoni kept him away from strike for three final overs. Anxiety had gripped all of us (Tendulkar fans) and we are not denying the fact that at that moment we were more interested in Tendulkars one run and not Dhoni’s sixes.

And, why not? Had Dhoni given Tendulkar the strike early, he would have easily scored 215-220, a near impossible target for the next generations of cricketers. We are happy because even after these odds -- including the one posed by Dhoni, which got averted thanks to the brilliant fielding by South Africa -- Tendulkar managed to keep his date with the history. He scored half the runs on the board and was given man of the match, I think that’s enough to settle your first objection.

Second: One ‘intellectual editor’ has commented that we Indian’s create god out of men. He has reportedly said that we have turned Tendulkar into a “gladiator” but he and his records will not help the people in India win their daily battle for bread!.
Now, this is something very very cynical. Unfortunately, my socialist friends are writing paras and paras supporting this non-cricketing argument. Going by this logic they may even hold Sachin guilty for the malnutrition in Melghat.

My dear critic we perfectly know that watching cricket will not give us bread nor any other materialistic pleasure. Do you really want to know why we watch him bat? The answer is very simple: It makes us happy. His hundred instills in us a sense of pride. A sense of satisfaction.
Dear ‘intellectual editor’ you may not be able to fathom this pleasure because it can not be compared with the pleasure one gets after pigging around.

True. “Gladiator” Tendulkar and his records will not help me and hundreds of his fans to win our daily battle for bread.
But my dear friend life is not all about winning bread.
Had that been the case we would be still living in caves as tribal’s.
========
Abhijit Atre
==========

Wednesday, February 24, 2010

QUOTES ON TENDULKAR: FIRST MAN TO SCORE 200 IN ODI

MY  FRIEND, RAJESH KORDE -- sports editor who was earlier with TOI and now working with a daily in Dubai had collected all these quotes on SACHIN. Here they are :--- A MUST READ FOR EVERY SACHIN FAN.
============================
"Nothing bad can happen to us if we're on a plane in India with Sachin Tendulkar on it."


- Hashim Amla, the South African batsman, reassures himself as he boards a flight.
=====
"Sometimes you get so engrossed in watching batsmen like Rahul Dravid and Sachin Tendulkar that you lose focus on your job."


- Yaseer Hameed in pakistani newspaper.
======
“Beneath the helmet, under that unruly curly hair, inside the cranium, there is something we don't know, something beyond scientific measure. Something that allows him to soar, to roam a territory of sport that, forget us, even those who are gifted enough to play alongside him cannot even fathom. When he goes out to bat, people switch on their TV sets and switch off their lives."


- BBC on Sachin
=======
"Tuzhe pata hai tune kiska catch chhoda hai?"


- Wasim Akram to Abdul Razzaq when the latter dropped Sachin's catch in 2003 WC.
=========
Sachin is a genius. I'm a mere mortal.


- Brian Charles Lara
===========
"We did not lose to a team called India...we lost to a man called Sachin."


- Mark Taylor, during the test match in Chennai (1997)
============
"The more I see of him the more confused I'm getting to which is his best knock."


- M. L. Jaisimha
===========
"The joy he brings to the millions of his countrymen, the grace with which he handles all the adulation and the expectations and his innate humility - all make for a one-in-a-billion individual,"


- Glen McGrath
============
"I can be hundred per cent sure that Sachin will not play for a minute longer when he is not enjoying himself. He is still so eager to go out there and play. He will play as long as he feels he can play,"


- Anjali Tendulkar
===========
"Even my father's name is Sachin Tendulkar."


- Tendulkar's daughter, Sara, tells her class her father's name after the teacher in-forms them of a restaurant of the same name in Mumbai.
===========
Question: Who do you think as most important celebrity ?


Shah Rukh Khan: There was a big party where stars from bollywood and cricket were invited. Suddenly, there was a big noise, all wanted to see ap-proaching Amitabh Bachhan. Then Sachin entered the hall and Amitabh was leading the queue to get a grab of the GENIUS!!


- Shah Rukh Khan in an interview.
==========
''India me aap PrimeMinister ko ek Baar Katghare me khada kar sakte hain..Par Sachin Tendulkar par Ungli nahi utha Sakte..''- Navjot Singh Sidhu on TV
=============
He can play that leg glance with a walking stick also.


- Waqar Younis
==========
Sachin Tendulkar has often reminded me of a veteran army colonel who has many medals on his chest to show how he has conquered bowlers all over the world. I was bowling to Sachin and he hit me for two fours in a row. One from point and the other in between point and gully. That was the last two balls of the over and the over after that we (SA) took a wicket and during the group meeting i told Jonty (Rhodes) to be alert and i know a way to pin Sachin. And i delivered the first ball of my next over and it was a fuller length delevery out-side offstump. And i shouted catch. To my astonishment the ball was hit to the cover boundary. Such was the brilliance of Sachin. His reflex time is the best i have ever seen. Its like 1/20th of a sec. To get his wicket better not prepare. Atleast u wont regret if he hits you for boundaries.


- Allan Donald
==========
On a train from Shimla to Delhi, there was a halt in one of the stations. The train stopped by for few minutes as usual. Sachin was nearing century, batting on 98. The passengers, railway officials, everyone on the train waited for Sa-chin to complete the century. This Genius can stop time in India!!


- Peter Rebouck - Aussie journalist
===========
"Sachin cannot cheat. He is to cricket what (Mahatma) Gandhiji was to poli-tics. It's clear discrimination. "


- NKP Salve, former Union Minister when Sachin was accused of ball tempering
==========
There are 2 kind of batsmen in the world. One Sachin Tendulkar. Two all the others.


- Andy Flower
=========
THESE THREE ARE THE BEST according to me:------------


(NO 3): "To Sachin, the man we all want to be"


- Andrew Symonds wrote on an aussie t-shirt he autographed specially for Sa-chin.
========
(No 2) "Commit all your sins when Sachin is batting. They will go unnoticed coz even the GOD is watching"


- A hoarding in England
========
(No 1): "I have seen god, he bats at no.4 for India"


- Mathew Hayden
=========================================

Friday, February 19, 2010

जर्मन बेकरी आणि माणुसकीचे कलेवर

जर्मन बेकरी आणि माणुसकीचे कलेवर

13 फेब्रुवरी 2010. पुण्याच्या इतिहासातला आणखी एक काळा दिवस. आणखी एक यासाठी म्हणतोय कारण की हा जरी पुण्यावरचा पहिला दहशतवादी हल्ला असला तरी पुण्याने असे खूप आघात पचवले आहेत.
या शहरावर खूप आक्रमणे झाली. प्रत्येकाचे स्वरूप वेगवेगळे होते ईतकेच. 19व्या शतकाच्या सुरवातीस इन्फ्लुयेन्ज़ाच्या साथीने शहरात थैमान घातले आणि नंतर प्लेगच्या साथीत  इंग्रजांनी.
शाईस्तेखानं आणि मुघलांचे हल्ले हे त्या काळातील दहशतवादीच हल्ले. पानशेतच्या पुरात वाहून गेलेले संसार पुण्याने पाहिले आणि स्वाइन फ्लूने घेतलेले 185 बळी ही.नारायणराव पेशवे, जोशी अभ्यंकर, राठी यांचे खून पाहिले आणि जनरल वैद्याना आलेले वीरमरण ही पहिले. अहो, फार कशाला, अगदी गाढवाचा नांगर देखील फिरला होता या शहरावर.
पण या सर्वातून पुणे सावरले.
सोन्याचा नांगर फिरवून हिंदवी स्वराज्याची मु-हुर्तमेढ ही याच शहरात रोवली गेली.
सार्वजनिक गणेशोत्सववाची सुरवात इथेच झाली. विद्येचे माहेरघर ही ओळख ही पुण्यानेच निर्माण केली. देशाच्या नेतृत्वाचे वैचारिक अधिष्ठान कायम पुण्याकडेच राहिले.  त्यामुळे जर्मन बेकरी वरील हल्ल्याचे दुख: पुणे पचवेल.
पुन्हा नव्या जोमाने उभे राहील. याची मला खात्री आहे.

पण दुख: पचवणे वेगळे आणि दुख: न होणे वेगळे.
गेल्या पाच दिवसात मी जसे माणुसकीचे झरे पहिले तसे कोरडे पाषाण ही पहिले.
हॉस्पिटल बाहेर रक्तदात्यांच्या रांगा पहिल्या आणि चित्रपटगृहाबाहेर सिनेरसिकांच्या.
मुलाच्या प्रेता समोर उन्मळून पडलेले आई वडील पहिले आणि पब्स मधील उचंबळून आलेली गर्दीही.
क्षणाची विश्रांती नं घेता धावाधाव करणारे पोलीस- फायरमन पहिले आणि ड्रम्सच्या कलकलाटावर थिरकणारी तरुणाइ ही  पहिली.
गाव दुखा:त आहे हे उमजून ठरलेले सार्वजनिक कार्यक्रम रद्द करणारे दाजी पहिले आणि जल्लोष करणारे पाजी ही पहिले.
प्रेतानवरचे हार पहिले आणि व्यालेनटाइनच्या गुलाबांची देवाणघेवाण ही पहिली.
माणुसकीचा गहिवर पहिला अन माणुसकीचे कलेवरहि.

मनावर आघात करणारी अनेक प्रसंग कानावर आले. दिसले. दोन तीनच सांगतो.
आमचा पत्रकार मित्र मिहीर टांकसाळे ससूनच्या डेडहॉउस मध्ये गेला होता.  बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या भावा बहिणीचे देह तिथे ठेवलेले होते. आई वडिलांचा आक्रोश चालू होता. तेथील ऑफिसरने मिहिरला अडवले. म्हणाला:
 "मी तुम्हाला त्यांना भेटून देतो पण त्या आधी तुम्ही मला त्या गाण्याचा कार्यक्रमाचा पास आणून द्यायची व्यवस्था करा,"
अंगावर काटा आला.
माणूस एवढा कोडगा होऊ शकतो?
प्रसंग दुसरा:
आमच्या ऑफिस समोर पुण्याचे प्रसिद्ध महाविद्यालय आहे. वर सांगितलेल्या प्रसंगातील बहिण याच महाविद्यालयात बी एं च्या वर्गात शिकत होती. तिच्या अकाली निधनाची आणि तिच्या आईच्या शोकाची बातमी सर्व पेपरमध्ये त्यादिवशी पहिल्या पानावर आली होती. ऑफिसला येताना मला महाविद्यालयाच्या दारात मुलींची खूप गर्दी दिसली. मला वाटले कि बहुतेक हि गर्दी श्रद्धाजली सभेसाठीची असावी. माझ्या पत्रकार मैत्रीण स्नेहलला मी त्या मुलींकडे पाठवले. ती सांगत आली "तुम्हाला वाटले होते तसे काही नाही. मुलींच्या वस्तीगृहाकडे जाणारा रस्ता नव्याने केला आहे. त्याच्या उद्घाटनास आमदार XXX येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गर्दी जमली आहे,".
हे सर्व स्फोटाच्या तिसरया दिवशी.
सुन्न झालो
प्रसंग तिसरा:
त्याच दिवशी कोरेगाव पार्क मध्ये ( जर्मन बेकरीच्या जवळच) एक श्रद्धाजली सभा होती. आमची स्वाती सभेला गेली होती. तेथील सर्व रहिवासी मेणबत्या घेऊन प्रार्थना म्हणणार होते. बराच वेळ झाला पण ती बातमी कळवत न्हवती म्हणून तिला फोने केला. स्वाती म्हणाली " अजून इथे लोकच आलेले नाहीत. फक्त पंधरा माणसे आहेत. फोटोग्राफरला सांगितले आहे कि फोटो लांबून घेऊ नको. जवळून घे. काहीतरी गर्दी दिसेल हो.,". (तिलाच काळजी होती कि किमान इतरांना कळू नये कि लोक श्रद्धाजली सभेस फिरकले सुद्धा नाहीत.).
 या ठिकाण पासून एक फर्लांगावर मोठे चित्रपटगृह आहे. घरी जाताना स्वाती तिथे डोकावली. "माय नेम इज खानं" चा शो हाउसफुल होता!

मनावर चरा उमटवणारे असे खूप प्रसंग सांगता येतील.
माझे सगळे शहर असे वागले असे नाही म्हणत मी.  
असे अनेकजण आहेत कि ज्यांचे पोट हातावर आहे. त्यांना भाकरीचा चंद्र मिळवण्यासाठी रोजच संघर्ष करायला लागतो. या चाकरमान्यांना दुख: करायची हि सवड नाही. त्यांचे वागणे मी समजू शकतो. त्यांच्या बोलण्यात झाल्या प्रसंगाबद्दल हळहळ होती. वागण्यात जल्लोष न्हवता. नजरेत संताप होता...अणि हतबलताही.

पण " अगा काही झालेच नाही" अशा थाटात वावरणारी खूप माणसे दिसली. त्यांचा कोडगेपणा आणि अलिप्तता खूप बोचली. हे लोक मला माझे नाही वाटले. परकीय वाटले. माझ्या शहराशी यांची नाळ जुळलेली नव्हती.  पण माझ्या दुर्देवाने त्यांची संख्या  मूठभर न्हवती.  अपेक्षेपेक्षा खूप  खूप मोठी होती. त्यातले कितीतरी लोक पुण्याचेच होते.
एकाला विचारले: " कारे तुम्हे असे कसे?. तुम्हाला दुख: नाही झाले?
त्याने ताम्बेंची कविता ऐकवली: "जन पळभर म्हणतील हाय हाय.... मी जाता राहील कार्य काय?,"
युक्तिवाद मान्य,? त्याने विचारले.
 मी युक्तिवाद करण्याच्या मनस्थितीच नव्हतो. नाही तर त्याला सांगितले असते कि मला हि तेच सांगायचे आहे की
" पळभर तरी तू हाय हाय म्हण मग लाग न तुझ्या कार्यास,".
त्याला मी वृत्तपत्रात आलेला एका मुलाच्या आई वडिलांचा फोटो दखवला. त्यांचा फुटबोल खेळणाऱ्या मुलाचे दोन्ही
पाय कापायला लागले होते. तरीही शेवटी मुलगा वाचला नाही. आई वडिल त्याच्या हॉस्टल रूममधे त्याची प्रत्येक 
वस्तु कुर्वाळत होते. त्यात त्याला शोधत होते. नाही सापडला.
"ठीक आहे.  वाईट गोष्ट झाली. पण  मी रडल्याने त्यांचा मुलगा परत येणार आहे का?  माझे सोड. फोटा पहा. आई रडते आहे. पण वडील बघ. डोळ्यात पाण्याचा थेंब तरी आहे का? तांबे म्हणतात  ना  कोणी कुणासाठी थांबत नाही," तो म्हणाला .
खरच फोटोत वडील रडताना दिसत नव्हते. चेहरा करारी होता. डोळ्यात पाणी नव्हते. पण त्यांचे ते स्थिर डोळे शून्यात काहीतरी शोधत होते. त्या  डोळ्यांकडे पाहून कळत होते की हा माणूस उद्धव्स्त झाला आहे.  फक्त त्या माउली समोर आपली वेदना तो लपवतो आहे. तो न रडणारा करारी बाप आतून किती आक्रंदत असेल याची कल्पनाही करवत नाही.

ताबेंच्या खूप आधी समर्थानी म्हटले आहे:--
" मरे एंक त्याचा --------दुजा शोक वाहे
अकस्मात तोही ---------पुढे जात आहे,".
काही लोकांनी यातले फक्त "अकस्मात पुढे जायचे" आत्मसात केले. पण पुढे जाण्याअगोदर दुजाने शोक वहायाचा असतो हे ते सोयीस्कर रित्या विसरले.
पुर्वी, खेड्यात एकाजरी घरी मृत्यू झाला तरी सगळा गाव सुतक पाळायचा.
“आज गावात चूल पेटली नाही” असे वर्णन केले जायचे.
माझ्याही शहराच्या पोटात अशी खूप खूप माया होती.
 ती आज मला कमी झालेली दिसली.
लुप्त झाली असे नाही म्हणणार मी. आहेत.. मदतीला धावणारे शेकडो हात अजून आहेत.  अहो, त्यावरच तर हे गाव तरले आहे.  पण या वेळेला जल्लोष करणारे ही खूपजण भेटले. अलिप्त आणि स्वय:म्केंद्रित.
त्यांना विनंती आहे.
तुमची चूल बंद ठेवा असे नाही सांगणार मी. रडायला तर मुळीच सांगत नाही. अहो, शेवटी दुख: मनापासून वाटले तर ते खरे. नाही तर तो राजकीय दुख:वटा साप्ताह व्हायचा.  इतरांचे दुख: स्वता:चे वाटले असते तर आपण  संतपदी पोहोचलो असतो.  त्यामुळे  तुम्ही नका काही वाटुन घेऊ.  तुमची चूलही चालूच ठेवा.  जीवनाचा आनंद लूटा.. अगदी जुरूर लूटा.
पण थोडा वेळ थांबा.  अहो फार नाही मागत मी.
फक्त थोडा तुमच्या जल्लोषाला आवर घाला.. थोडे थांबा हो  प्लिज.
अहो... किमान दहावा तरी होऊ द्यात हो.
=============================================
अभिजित अत्रे
===============================================

Wednesday, February 10, 2010

क्या आपकी चप्पल उठाएंगे गृहमंत्री?

क्या आपकी चप्पल उठाएंगे गृहमंत्री?
रविवारचा दिवस. सुट्टी. बायकोने उठवले पण खूप कंटाळा आला होता. त्यात शनिवार रात्री  शेवटची बातमी सोडायला रात्रीचे बारा वाजले होते. राहुल गांधी दुपारी ट्रेन ने  फिरला पण त्याची बातमी आमच्या रिपोर्टरने रात्री 11 ला फाइल केली. तो तरी काय करणार?.  व्हिडियो फुटेज मध्ये राहुल ट्रेन मधे दिसत होता पण रेलवे म्यानेजरचा  कोट हवा होता.
ती लोकल होती का एक्सप्रेस?. (शेवटी प्रिंट मीडीया मधे "कोट" महत्वाचा. काय दिसते ते गेले तेल लावत).
शिवाय बातमीत राहुल ने  एटीम मधून पैसे काढले होते हा ब्रेकिंग न्यूज़चा मजकुरच नव्हता.  केवढा महत्वाचा पॉइण्ट मिस झला होता!!!. तरी बर, गृहराज्य मंत्र्यानी राहुलचे जोडे उचलले ही टीव्ही वर सतत दिसणारी बातमी आमच्या स्पेशल करसपोंडांट  ने स्वता:ची बाइलाइन घेऊन रात्री 10 लाच दिली होती.
शनिवारी घरी यायला एक  वाजला. रविवारी नाश्ता करून आणि टीव्हीवरच्या बातम्या पाहून पुन्हा एकदा मस्त ताणून द्यायचा विचार होता. चहाचा कप हातात पडताच मी "घी न्यूज़ चॅनेल लावला. चर्चा चालू होती.  ऐका  तर:-----
घी न्यूज़:
निवेदक:-- महाराष्ट्राचे गृहाराज्य मंत्री रमेश बागवे यांचे असे म्हणणे आहे की आतीथी देवो: :भव. अतिथीचे जोडे उचलणे ही महाराष्ट्राची पांपराच आहे. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राच्या परंपरांचे अभ्यासक डॉक्टर कुटे.
(अनेक वर्ष मला एक प्रश्न सतावत होता की या कुटेला पुणे  विद्यापीठाने पी.एच. डी.  कशी दिली?. पारवा त्याचा शोध लागला. एकाने सांगितले की कुटेचा पी.एच. डी.चा विषय खूपच वेगळा होता:-- “वाढते प्रदूषण आणि गोंधळायांची रोडवणारी संख्या”.  त्याने हे सिद्ध केले की प्रदूषणामुळे  गोंधळायांच्या आवाजावर परिणाम होत गेला. आणि त्यामुळे त्यांची संख्या रोडावली. लगेच मिळाली  पी.एच. डी.)
डॉ कुटे “ बागवे म्हणतात त्यात चुक काहीच नाही  दर वर्षी माउलीच्या  पा दुका घेऊन हजारो वारकरी पंढरपुरची वारी करतात. पुर्वी यात गोंधली ही खूप मोठ्या संखेने सामील व्हायचे पण हवेच्या प्रदूषणामुळे गोंधळायांच्या आवाजावर परिणाम होत गेला ...... (पी.एच. डी. चे वाचन सुरू......... मी चॅनल बदलतो)

मैत्रीण टी व्ही:
निवेदिका:  तर आज आपल्याकडे पाहुण्या म्हणून आलेल्या आहेत प्रसिद्ध  उद्योजिका सौ भाम्बरगोटे . यांची पापडाच्या लाटया  बनवायची फॅक्टरी आहे. या महाराष्ट्राच्या टाटा आहेत (पापडाच्या लाटया आणि टाटा? काय तुलना आहे. वा. ) ..... ताई नामस्ते.!
भाम्बरगोटे: नामस्ते!.
निवेदिका: तर आपला आजचा विषय आहे राहुल गाँधीनच्या  चपला. मॅडम तुम्ही  काय सांगू शकाल    या   चपलान  बद्दल?.
भाम्बरगोटे:  चपला... चपलान .... चपलान ..  हा.. चपलंन्वरून आठवले की पुर्वी अनेक बायका  चपलाहार घालायच्या. खूपच सुंदर दागिना. हल्ली कुणी घालत नाही.
निवेदिका: तुम्ही  ती  एतिहासिक  सीरियल पहिलित का?  त्यात मृणालने घातला होता चपलाहार.
भाम्बरगोटे:  हो. आत्ता लक्षात आले. पुन्हा गाडगिळानी दिला होता म्हणे तिला. तोही फ्री.
निवेदिका: पुन्हा म्हणजे?:
भाम्बरगोटे:  पुन्हा नाही हो. पु ना … पु ना गाडगीळ.
निवीदेका: हा हा. अय्या फ्री.  काय लकी आहे ना मृणाल…. मैत्रिनिनो तुम्ही पण आशाच लकी बनू शकता.
भाम्बरगोटे:  हो ना.  इश्य... आपले  थोडेसे विषयानतर झाले.... ((थोडेसे? मी मनातल्या मनात)
निवेदिका: चालते हो. (मैत्रीण मधे काहीही चालते – मी मनात).  जाउदे.... आपण प्रश्न घेउया...  हा.. प्रश्न  विचारा .... .चप्पले बद्दल विचारा … चपलाहराबद्दल नको…  ह्या ... ह्या... ह्या.
पालीकडून एक आवाज़: हेलो हेलो …. …
निवेदिका:  हा बोला..... बोला...... प्रश्ना विचारताना . तुमचा  टीव्ही चा आवाज़  कमी करा...
(आवाज़ कमी करा... ही बहुतेक एक छुपी जाहिरात आहे. बांदके हियरिंग सर्विस
या जाहिरातीची स्पॉन्सोरर् आहे अशी माझी माहिती. मी चॅनेल बदलतो)
माहाचर्चा टीव्ही:
निवेदक: बागवेनि केले ते योग्या नव्हते असे बीजेपी आणि शिवसेनेचे म्हणणे आहे. आबुजी तुम्हाला काय म्हणायचे आहे?.
आबुजी: समजवादी पक्षाचे हे म्हणणे आहे की शिवसेनेचे वागणे दुतप्पी  आहे. राज कपूर ने मेरा जुता है जपानी हे गाणे म्हटले पण त्याच्या पिक्चर चे पोस्टर यानी कधी फाडले नाही. आर के स्टुडिओ मुंबईतच होता ना? तेव्हा यांची मराठी अस्मिता कुठे गेली होती?  हिम्मत असेल तर यानी जपानवर हल्ला करावा (जपानचा इथे काय सम्बन्ध.. मी मनात). 
निवेदक: अगदी बरोबरे आहे. दलवारीजि… कॉंग्रेस पक्ष्याची यावर काय भूमिका आहे?
दलवारी: “ कॉंग्रेस चे असे म्हणणे आहे की बीजेपी आणि सेनेने त्यांचा इतिहास तपासून पाहावा. ज्या प्रभू रामचंद्रच्या नावावर हे लोक निवडनूक  लढवतात त्याच्या पदुका कोणी उचलल्या होत्या ते पहावे”.
निवेदक: अगददी बरोबर आहे. म्हणजे भरताने रामाच्या पदुका उचलल्या ते  याना चालते.  यानी कधी मराठी माणसांचे जोडे तरी उचलले आहेत का? मराठी माणसाच्या नावावर आणि रामाच्या नावावर याना मते मागता येतात पण त्यांच्या मूळ प्रश्नांकडे यांचे किती लक्ष आहे?
(( या पुढचे भाषण मला पाठ आहे.   मी चॅनल बदलतो)
सबसे तेज:
निवेदक: बग्वेने राहुल के जुते उठाने की खबर सबसे पेहेले  हमने आपको दि थी. (क्रेडिट सोडायाचे नाही). दर्शको आज हमारे साथ  है महाराष्ट्रा के प्रमुख गृहमंत्री.  आर आर आर जी.  बागवेसाहब ने कहा की उन्को ऐसी अशंका थी की कोई आतंकवादी इन जूतों मै कुछ छुपा देता. क्या मुंबई फिर से खतरे मै है?
आर आर आर जी::-- " खत्रेकी कोई बात नाही है. परन्तु इस घटना की जाच चालू है
निवेदक:: क्या अपका कहेना है की आतंकवादी मुंबई मै कोई भाई चप्पल चुरा नाही सकते?
आर आर आर जी::-- इतने बडे शहर मे एक दो छोटी चप्पल  तो चोरी होती है रेहेगी”.
निवेदक:; अभी अभी आपने सुना की आर आर आर जी ने  कहा की इतने बडे शहर मे एक दो छोटी चप्पल तो चोरी होती है रेहेगी... इतने बडे शहर मे एक दो छोटी चप्पल तो चोरी होती है रेहेगी...... इतने बडे शहर मे एक दो छोटी चप्पल तो चोरी होती है रेहेगी..... इतने बडे शहर मे एक दो छोटी चप्पल तो चोरी होती है रेहेगी....
( कितीदा सांगितले आहे की हिंदीत बोलू नका आर आर आर जी .. ) 
चोवीस तास न्यूज़:
इथे चर्चा पूर्ण रंगात आलेली असते
निवेदक: ऍम.ऍम.स  आपको क्या लागता है?
मनसे:  हमारा कहेना की मुंबई मै सिर्फ मुंबई की ही चप्पल चलेगि. बिहार की चप्पल हम मुंबई मे पेहननेको नही देंगे.
निवेदक: सेना अपकी क्या राय है?
सेना:  इनोहोने कोई नई बात नाही काही. हम ये  पेहेलेसे बोल रहे है की हे है की चप्पल मुंबई की ही हो.
निवेदक: दर्शको सवाल ये नाही है की बागवे ने राहुल की चप्पल क्यू उठाई .  सवाल ये है की ये चप्पल  कहा बनी थी?   ऑर दुसरा सवाल ये है  की क्या आपकी चप्पल उठाएंगे गृहमंत्री?
(कुठून कुठे पोहचतात हे लोक  मी चॅनल बदलतो)

आयुर्वेद चॅनेल:
(मी सुटकेचा निश्वास टाकतो.  इथे बातमी येणे कधीच शक्य नाही)
वैद्याचार्य: 
“भारता मधे हजारो लोक  रोज सकाळी तांब्या घेयुन बाहेर पडतात.  अनेक लोक चपला घालत नाहीत. उघड्या पायानी ओणवे   बसल्याने पायावर दाब येतो.  शरीराचे संतुलन बिघडते.
चपला नसल्याने पायाला काटे बोचतात. मग पायाला कुरूप होते. पण आयुर्वेदात यावरचा उपाय सांगितला आहे.
शुश्रुताने  असे सांगितले आहे की पायाला कुरूप जहाल्यास तळपायवर गाईच्या शुद्ध तूपाने स्नेहन करावे. पण हे तूप सिद्ध केलेले हवे. पण प्रश्न हा आहे की लोक  चपला का घालीत नाहीत. बर्‍याच लोकानी असे सांगितले की त्याना चप्पल चावते. या कठीण चपला मऊ  कश्या करायच्या याचाही उपाय शुश्रुताने संगीतला आहे.
((हे शुश्रुत या काळात भेटले  असते  तर मी त्यांचा शनिवारवाड्यावर ख़ास सत्कार केला असता.  काय 
दूरदृष्टी आहे.   चपला मऊ कश्या करायच्या हेही त्यानि  सांगितले आहे))
वैद्यांचे अखंड प्रवचन चालूच असते: " तर कोल्हापुरी चपला जर चावत असतील तर त्या  तिळाच्या तेलात बुडवून ठेवाव्यत. त्या तेलात थोडा अष्टमध्  टाकावा आणि थोडे चन्दन. तिळाचे तेल वातहारक असते. काफ अणि पित्त कमी करते. बळ आणि तेज वाढवते. ((याचा इथे काय संबध.. मी मानांत).  अशा सिद्धा तेलातुन बाहेर काढलेल्या चपलेला एक अंगभूत  चमक येते.  पोलिश करण्याची गरज राहत नाही. यानंतर या चपलेला सिद्ध तूप लावावे. तुपा मुळे चप्पल बळकट होते. 
शुश्रुत सांगतो की अशा चपलेचा  अंगठा तुटत नाही!!!  महाभारतात जेंव्हा एक्लाव्याचा अंगठा तुटला तेव्हा  त्याने  सिद्ध तूप आणि मनुका…...”  ( चापलेचा अंगठा… एकलॅव्याचा अंगठा… सिद्ध तूप…मनुका.. मी चॅनेल बदलतो”)
बिंडीया टिव्ही:  
( निवेदिका बर्फात उभी असते अणि मागे आपल भव्या हिमालय दिसत असतो)
निवेदिका:  मै जहापे खडी हु...... इसी जगहपे कुछ देर  पहेले यति आए थे. हमअरे वैद्यानिकोने (हे वद्यानिक नेमके कोणत्या सरकारी खात्यात कम करतात अणि ही माहिती ते  फक्त याच चॅनलला का देतात देव जाणे)
यति के पैरो के निशाण देखे है.
आओ आपको दिखते है इन निशनोकी ताजा तसबीरे. देखो पैरो के   निशनोके साथ साथ  उँग्लियोके निशाण भी सॉफ सॉफ दिखाई देते है (असणारच. उंगली पायाचा  एक भाग आहे,  बाई)  
 इन निशनो से पता लागता है की यति इन बर्फा मे बिना चप्पल या बिना  सूज पेहेने घूम रहे है. क्या आप इतनी बर्फ मे नंगे पाव चल सकते है?
( माजी आज्जी मधेच मला म्हणते.. हा यति कोण आहे तुला माहीत आहे का अभिजीत.. अरे हा यति म्हणजे आपला महाभारतातला आश्वथमा. त्याला ओळखणे खुप सोपे आहे. त्याच्या कपाळावर एक जखम आहे. ती कधीच भरून येत नाही....... इण्टरेस्टिंग माहिती....... मी टिव्ही चा आवाज वाढवतो. बिंडीया चालूच असतो.)
निवेदिका: हम  आपाको ले चलते हे दिल्ही. यहाँका ये सबसे बडा शू मार्ट. कटा शूज. देखो इनके पास क्या नाही है.
ये रेड चीफ के शूज. . राजस्थान की मोजडी.... बाता के सॅण्डल.... वूडलैंड के फ़्लोटेर्स... एक्शन के  स्लिपर. (बातम्यांच्या नावा खाली काय भारी जाहिरात करते आहे ही बाई.. मी मानांत).
“लेकिन क्या इनके पास यति के पैरो के साइज़ के शूज है. आओ पुछाते ई इस स्टोर के मालिक से,".
“ मिस्टर काटा आपके पास का सबसे बडा चप्पल कॉन्से साइज़ का है
“11 नंबर”, काटा.
“ देखा. यति के पैरो के नापवाला शू इनके पास नाही है. लेकिन लेकिन... लेकिन ... अगर यति ऑर्डर देते है तो बिंदिया टिव्ही के लिये मिस्टर काटा ऐसी चप्पल बनायेंगे.... इतना तो हमें यति के लिए करनाही पड़ेगा......".
( बाई, तो गेली हज़ार वर्षे बिना चापलेचा फिरतो आहे आता त्याला शूज कशाला लागतील... मी मनात)

रविवारीही चप्पल काही माझी पाठ सोडायला तयार नसते.  मी टिव्ही बंद करतो आणि चप्पल न घालताच
घराबाहेर जायला लागतो. 
बायको:  अभिजीत कुठे चाललास?
मी:: मी राहुल गांधींची चप्पल आणायला चाललो आहे
बायको: अभिजीत तुला बरे नाही का? कितीदा सांगितले आहे फार वेळ बातम्या पाहु नको. डोक्यावर परिणाम होतो!!
मी: फार वेळ नाही पहिल्या. एक तासच झाला. परवा डॉक्टरने देखील सांगितले ना की एक तास बातम्या पहिल्याने डोक्यावर परिणाम होत नाही म्हणून
बायको: पण कशाला विषाची परीक्षा? (!)
“अग. आश्वथामा सापडला आहे. तो  बिचारा बर्फात आनवाणी फिरतोय. त्याला  गांधींनच्या सर्वसमावेशक चपला येतील. येताना एक कीलोभर सिद्ध तूप पण आणतो. थोडे माझया डोक्यावर थापतो आणि उरलेले आश्वथाम्याच्या.  सिद्ध तुपाने चप्पल बरी होते माग  आश्वथाम्याची जखम का नाही बरी होणार?,” असे म्हणून मी एम् अफ हुसेनच्या  अवतारात घराबाहेर पडलो.
===
(Dear readers,  the above post is imaginary and is not intended to defame or hurt anyone. It has been written in a lighter vain and I appeal you to take it in the right spirit. Also, pls excuse for the typos, I am quite new to Marathi typing. Need some more followers to this blog so that it gets displayed in the blog list with google. If you consider that the posts are worth reading, please support by following the blog link and  pls give your comments, they help. Thanks for sparing your time.------------Abhijit Arvind Atre). 
=============