परीराणी परीराणी --- का गं तुझ्या डोळा पाणी
पिंजलेल्या धुक्यातून --- का गं तुझी उदास कहाणी?
परीराणी परीराणी--- तुझा झगा कसा फाटला
जादूच्या छडीवरचा --- तारा कसा तुटला?
परीराणी परीराणी--- का गं तुझी मूक वाणी
चांदण्यात भिजलेली --- गेली कुठे तुझी गाणी?
परीराणी परीराणी--- तुझे पंख कुठे गेले
आकाशाला वेढणारे --- तुझे स्वप्नं कुठे गेले?
परीराणी परीराणी--- तुझे रंग का गं उडून गेले
परीराणी परीराणी--- तू लग्न का गं केले?
====================
अभिजित अत्रे

7 comments:
Parirani..shevatchi line khup kahi sangun jate.....
Parirani...sagalya mulinchi swapne ashich waryawar wirun jataat..! Kaay he !
Tujhi kavita vichar karayalaa lawanaari aahe!
- Subhash Naik.
Thanks Mihir. The last line is an answer to all questions raised earlier in the poem. Pari-Rani symbolises an innocent girl who was once full of life and energy, but whose dreams were shattered because of a bad marriage. Though this not a general phenomena and woman do happily live with their ‘most obedient’ husbands (like us!), have seen many cases wherein a bad marriage has ruined the aspirations of the girl. Va Pu Kale has written a fantastic short story book on this topic, titled “TAPTA-PADI”, worth reading. This poem is it’s abridged version.
'काग'...प्रत्येकवेळी खटकते. त्याऐवजी 'का गं' वाचायला आवडले असते. शेवटची ओळ वाचेपर्यंत बालगीत वाटले. शेवटच्या ओळीत परी एकदम विवाहीत झाली आणि सगळेच संदर्भ बदलले. छान.
'काग'...प्रत्येकवेळी खटकते. त्याऐवजी 'का गं' वाचायला आवडले असते. शेवटची ओळ वाचेपर्यंत बालगीत वाटले. शेवटच्या ओळीत परी एकदम विवाहीत झाली आणि सगळेच संदर्भ बदलले. छान.
शेवटच्या ओळीने नवा संदर्भ दिला. वरती सुकृत करंदीकर यांनी सुचवल्याप्रमाणे 'काग' याऐवजी 'का गं' असा शब्दप्रयोग करावा.
Thanks Sukrut and Aativas. have made the correction in 'का गं' as suggested. do point out the corrections they are most welcome.
regs
abhijit atre
Post a Comment