त्या तिथे खोदा
तिथे दडवली आहेत
पिळदार बाहूंवर सजलेली
सोन्याची कडी
अन, त्या पेटीत आहे
मानस सरोवरातील राजहंसांचा चारा
पोपटाच्या डोळ्यासारखे गोल गोल मोती
पलीकडच्या तळघरात आहे ते धनुष्य
त्यालाही मढवून ठेवले आहे नवंरत्नांनी
तेवढी ती सन्दुक मात्र
जपून उचला
त्यात आहेत ते मयसभेतील
बिलोरी आरसे आणि
स्फटिकाची झुंबरे
सांगत होता तो इतिहासपुरुष
पुरातत्व खात्याच्या चार संशोधकांना
ज्यांनी खोदून काढला होता
धरणीच्या उदरात लुप्त झालेला
एका महापराक्रमी विराचा राजमहाल
पण जेव्हा मारला गेला हातोडा
तख्ताखालच्या संगमरवरी फरशीवर
तेव्हा क्रोधीत झाला तो इतिहासपुरुष
थांबा! तेवढे ते भुयार खोदू नका
तिथे काहीच नाही महत्वाचे
किंचाळला तो.
तरीही उतरले संशोधक त्या
अंधारलेल्या तळघरात, आणि
घेऊन आले बाहेर एक
शेवाळलेली पेटी
पण खरे ठरले भाकीत इतिहासपुरुषाचे
त्या पेटीत होते एक
गंजलेल्या बाणाचे पाते,
एक भुस्सा झालेले लाकडी चक्र,
एक निळे जांभळे निस्तेज चिलखत
आणि, हाडाचा एक लहान तुकडा.
त्या दिवसापासून बंदी घातली गेलीय
सिंहासनाखालची भुयारे खोद्ण्यावर
आणि ही बंदी रास्तही आहे
कारण कोणत्याही सिंहासनाखाली
तसे काहीच नसते मौल्यवान
तिथे सापडते फक्त
शिखंडी आडून लक्ष्यभेद करताना
शरमून अक्षय भात्यातच रुतलेले
जे रुतले होते रणात आणि
ज्याच्या अरीवर मारला होता गेला होता
एक शापित योद्धा
तिथे असतात कुणाचीतरी
फसवून आणलेली निरुपयोगी
कवचकुंडले
आणि हो,असतो तिथे
एक कोवळेपणी कापलेला
अंगठा
या आणि अशाच सटर फटर
वस्तू असतात तख्ताखाली
मूल्यहीन आणि फुटकळ
पण त्यांच्यावरच उभे असते
प्रत्येक सिंहासन!
==========
अभिजित अत्रे
तिथे दडवली आहेत
पिळदार बाहूंवर सजलेली
सोन्याची कडी
त्या भुयारात मिळतील
तिच्या स्वयंवरासाठी खास घडवलेले
पाचूचे बाजूबंदअन, त्या पेटीत आहे
मानस सरोवरातील राजहंसांचा चारा
पोपटाच्या डोळ्यासारखे गोल गोल मोती
पलीकडच्या तळघरात आहे ते धनुष्य
त्यालाही मढवून ठेवले आहे नवंरत्नांनी
तेवढी ती सन्दुक मात्र
जपून उचला
त्यात आहेत ते मयसभेतील
बिलोरी आरसे आणि
स्फटिकाची झुंबरे
सांगत होता तो इतिहासपुरुष
पुरातत्व खात्याच्या चार संशोधकांना
ज्यांनी खोदून काढला होता
धरणीच्या उदरात लुप्त झालेला
एका महापराक्रमी विराचा राजमहाल
पण जेव्हा मारला गेला हातोडा
तख्ताखालच्या संगमरवरी फरशीवर
तेव्हा क्रोधीत झाला तो इतिहासपुरुष
थांबा! तेवढे ते भुयार खोदू नका
तिथे काहीच नाही महत्वाचे
किंचाळला तो.
तरीही उतरले संशोधक त्या
अंधारलेल्या तळघरात, आणि
घेऊन आले बाहेर एक
शेवाळलेली पेटी
पण खरे ठरले भाकीत इतिहासपुरुषाचे
त्या पेटीत होते एक
गंजलेल्या बाणाचे पाते,
एक भुस्सा झालेले लाकडी चक्र,
एक निळे जांभळे निस्तेज चिलखत
आणि, हाडाचा एक लहान तुकडा.
त्या दिवसापासून बंदी घातली गेलीय
सिंहासनाखालची भुयारे खोद्ण्यावर
आणि ही बंदी रास्तही आहे
कारण कोणत्याही सिंहासनाखाली
तसे काहीच नसते मौल्यवान
तिथे सापडते फक्त
शिखंडी आडून लक्ष्यभेद करताना
शरमून अक्षय भात्यातच रुतलेले
न सुटलेल्या पहिल्या बाणाचे पाते
तिथे असते फक्त एक जुने रथचक्रजे रुतले होते रणात आणि
ज्याच्या अरीवर मारला होता गेला होता
एक शापित योद्धा
तिथे असतात कुणाचीतरी
फसवून आणलेली निरुपयोगी
कवचकुंडले
आणि हो,असतो तिथे
एक कोवळेपणी कापलेला
अंगठा
या आणि अशाच सटर फटर
वस्तू असतात तख्ताखाली
मूल्यहीन आणि फुटकळ
पण त्यांच्यावरच उभे असते
प्रत्येक सिंहासन!
==========
अभिजित अत्रे
6 comments:
अप्रतिम!
WOW...WHAT A POEM! MANJIRI
Good one sirji !!!
सुंदर!
बहोत बढिया.....
kyaa baat..! excellent
Post a Comment