Wednesday, July 4, 2012

गम्मतगाणे:: आयझ्याक न्यूटन आणि दिगंबर शहाणे

किव येते मला आर्यभट्टाची, पूर्वजांची, भारतीयांची
सरशी होऊ दिली त्यांनी त्या आयझ्याक न्यूटनची
मी नसती वाट पाहिली सफरचंद पडण्याची
गरज काय हो असल्या वेळखाऊ प्रचितीची?


असेच काहीतरी म्हणाला होता दिगंबर शहाणे
आकाशात दगड भिरकावून त्याने अगदी सहजपणे
सिद्ध केला होता नियम गुरुत्वाकर्षणाचा
आम्हीही केला होता तेव्हा गजर टाळ्यांचा


अशीच दाद दिली होती त्याला अख्या वर्गाने
जेव्हा दिगंबरने उचली होती शेंगांची टरफले नेटाने
आणि टिमवर्कचे महत्व समजावून सांगून खास
त्याने बाळ गंगाधर टिळकास केले होते नापास


तेव्हा वाटायचे दिगंबर खूप मोठा होणार
त्याच्याकडे पाहताना आपली टोपी पडणार
इतरांच्या टोप्याच उडवत राहिला तो आयुष्यभर
पण दिगंबर शहाणे नाही झाला मोठा वितभर


तेंडूलकरचे शंभरावे शतक पाहताना
तो पॉटिंगच्या आठवणीने गहिवरायचा
लताचा आर्त सूर ऐकताना
दिनानाथच्या पार्किगबद्दल बोलायचा


दिगंबर अजूनही विचारतो सर्वाना
किशोरकुमार सहनच कसा होतो लोकांना?
अमिताभला जर अभिनेता म्हणायचे
तर बेन किंग्सलेने काय करायचे?


दिगंबरला हापूस आंबे...आवडत नाहीत
दिगंबरला काजूही ...आवडत नाहीत
पानात वाढली पुरणपोळी जरी
तो  म्हणणार या पेक्षा पाणीपुरी बरी


दिगंबरची जमात पसरलीय खोलवर
भेटते ती शाळेत, कचेरीत, रस्त्यावर
सगळेच दिगंबर रोज थुंकतात एका सूर्यावर
आणि आपले वेगळेपण मिरवतात बघ्यांनवर


मी मात्र आता त्याच्या भोवतालच्या गर्दीत नसतो
दिगंबरचा चेहरा मला चिकट व गलिच्छ भासतो
मान वर करून जेव्हा तो सूर्यावर थुंकतो पचापचा
विसरतो तेव्हा तो न्यूटनचा नियम गुरुत्वाकर्षणाचा
==========
=============
ता.क: दिगंबर शहाणे हे नाव काल्पनिक आहे, पण व्यक्ती खरी आहे. खरे नाव सांगता येत नाही कारण दोन तीन शहाणे आजूबाजूलाच आहेत. असेच, काही अधिक- काही उणे, दिगंबर शहाणे तुमच्याही भोवती असतील. तुम्हाला ते जर भेटले नसतील तर तुम्ही भाग्यवान आहात.----- अभिजित अत्रे
======

7 comments:

Unknown said...

khup chhan

www.hindmaratha.com said...

astat ase shhane

Amit said...

Fantastic. Blog is truth. Surya is kalpana. Jari surya rahila tari suryast hotoch!!

Sukrut Karandikar said...

झक्कास...अनेक 'दिगंबर शहाणे' आपल्याला विळखा घालून बसल्येत. आपल्या पत्रकारीतेच्या क्षेत्रात तर अशा दिगंबरांच्या ठेचा पदोपदी लागतात. मस्त झालेय गम्मतगाणे. ('आषाढी'पेक्षा खुपच चपखल) आता जमेल तेव्हा 'चिंतातूर जंतूं'चाही समाचार घ्या. हे गम्मतगाणे मी फेसबुरवर 'शेअर' करतोय.

Sukrut Karandikar said...
This comment has been removed by the author.
www.hindmaratha.com said...

masta astat ase lok

Anonymous said...

Abhijit Ekdum masta...sahiiiiii...I especially liked the line tendulkarchya....

Manjiri