चाल: मोठ्याने
संगीत: मकरंद अनासपुरेचा गावठी हेल
=========
घड्याळाचे सेल चाइनीज
प्लास्टिकचे वेल चाइनीज
ब्याडमींनटनचे फूल चाइनीज
कानातले डूल चाइनीज
------- जगात चारातले एक मूल, ते पण चाइनीज
***
मैत्रिणीने रेसिपी टाकलीय फेसबुकवर
शेजवान ट्रीपल राइसइचा फोटो पानावर
मीही टाकलीय कॉमेन्ट चिनीसारखी गोड
भारतीय वाटण्याला येणार बेजिंगचे मोड
--------बोला.. हिंदी चीनी भाई भाई!
***
मित्र दाखवतोय मोबाइल भारी
उल्हासनगरावर चायनाची स्वारी
राक्षबंधनालाही बाधलेत जागतिकीकरणाचे वारे
राखीचे भगवे गोंडे ही चाइनीज सारे
-------बोला..डॉक्टर कोटणीस अमर रहे"
***
दामू दहावीला नापस झाला
दलाई लामा तरी प्रसन्न त्याला
चायनीजच्या टाकल्यात गाड्या तीन
बाकावर बसून हाणता येते जीन
--बोला..हक्का नुडल्स खाणे आमचा जन्मसिद्ध हक्क आहे
***
दूर दूर सारा आता जपानी निन्न्जा
चिन्याला करा आता आपला भांजा
रक्ताळला जरी हाताचा पंजा
पतंगातून लोंबूदे तरी, चाइनीज मांजा
-----लवकरच मिळणार.. होळी स्पेशल.. चाइनीज गांजा
***
केसरीची पानभर जाहिरात
चायनाची टूर वीस हजारात
कशाला उरी टाइनामन स्क़्वेअरची खंत?
पहा लांबच लांब पसरलेली कीर्तिमान भिंत
--- बोला.. कम्यूनिझंम झिंदाबाद, तिबेट-अक्साईचिन झिंदाबाद
***
आपल्या इंडियन्सना महत्वच कळत नाही हेरीटेजचे
ए, विस्की दे, चायनीज भेळ दे, पैसे घे सिगारेटचे
द्यानेश्वाराने तर भिंत चालवलेली आकाशात गरागरा
प्रिझव केली असती, च्याएनाचा जिरला नसता तोरा?
-----"बारमध्ये बसा बसा...हळू हळू भिंतही हलते".
***
शेजारच्य आज्जी आल्यात तीर्थयात्रेवरून
जप मोजायचे चीनी यंत्र आणलय हरिद्वारवरून
गंगाजलाचा चाइनीज गडू, स्लाइडिंग सील असलेला
तीनदा वापरता येतो, परत जायलाच नको गंगेला
--गडू उपडा करू करू...आज्जी, आजोबा..मग कोणाला मारू?
***
आज्जीनी भेट दिलाय चायनिज गणपती खास
उदबत्तीच्या पुड्यामध्ये झुरळाचा भास
शेवयाच्या खिरीला येतोय नुडल्सचा वास
कणकेला लावणार बायका आता सोया स्वॉस
-- बस टू मिनिट्समध्ये तयार होणार बघा जेवण सुग्रास
***
ड्र्यगनने काबीज केलीय सगळी बाजारपेठ
घरी दारी सर्वत्र चीनी वस्तू उमेठ
तुळशीबागतरी नको बनायला शांघायची पेठ
आत्ता खुडलाच पाहिजे या म्याग्गीचा देठ
--- पण माझ्या नवसाला पावणार का हा..चायनिज दगडूशेठ?
=============
अभिजित अत्रे
=========