ठाऊक आहे मला
एके दिवशी परत करायला लागेल
ज्याचे त्याला, हे शरीर
आणि मग कोण जाणे किती
नश्वर आवर्तने करून पुन्हा मी
जन्मीन, एक माणूस म्हणून
भीती मरणाची नाही
भीती ही आहे कि तेव्हाही मी
असाच बेसावध राहीन याची
आणि तसे झाले तर पुन्हा,
पुन्हा व्हावे लागेल निरुत्तर
जेव्हा विचारील ते टोकदार प्रश्न
तसा मी वाकबगार आहे उत्तरे देण्यात
बायकोला, साहेबाला, मित्रांना
अगदी वकिलाच्या नोटिशीचाही
मी भूगा भूगा करतो माझ्या
हजरजबाबी वाणीने आणि पेनाने
पण ते चालून येते माझ्यावर
सवालांचे अठराअक्षौहिणी सैन्य घेऊन
आणि एका क्षणांत चोळामोळा करते
माझ्या समर्थनांच्या बुजगावण्यांचा
तसे फार मोठे नाही ते
माझ्याच एवढे आहे
आणि जगेलही माझ्याच एवढे
अजून पाच.. दहा.. वीस .. तीस वर्ष
नक्की किती हे फक्त ते जाणून आहे
ते.... माझेच आयुष्य
ते विचारते मला जीवघेणे प्रश्न
माझ्या बिछान्या भोवती
दात कोरत उभे राहते ते रात्री
आणि मला विचारते जाब
मी वाया घालवलेल्या त्याच्या
वर्षांचा.
=================
अभिजित अत्रे
एके दिवशी परत करायला लागेल
ज्याचे त्याला, हे शरीर
आणि मग कोण जाणे किती
नश्वर आवर्तने करून पुन्हा मी
जन्मीन, एक माणूस म्हणून
भीती मरणाची नाही
भीती ही आहे कि तेव्हाही मी
असाच बेसावध राहीन याची
आणि तसे झाले तर पुन्हा,
पुन्हा व्हावे लागेल निरुत्तर
जेव्हा विचारील ते टोकदार प्रश्न
तसा मी वाकबगार आहे उत्तरे देण्यात
बायकोला, साहेबाला, मित्रांना
अगदी वकिलाच्या नोटिशीचाही
मी भूगा भूगा करतो माझ्या
हजरजबाबी वाणीने आणि पेनाने
पण ते चालून येते माझ्यावर
सवालांचे अठराअक्षौहिणी सैन्य घेऊन
आणि एका क्षणांत चोळामोळा करते
माझ्या समर्थनांच्या बुजगावण्यांचा
तसे फार मोठे नाही ते
माझ्याच एवढे आहे
आणि जगेलही माझ्याच एवढे
अजून पाच.. दहा.. वीस .. तीस वर्ष
नक्की किती हे फक्त ते जाणून आहे
ते.... माझेच आयुष्य
ते विचारते मला जीवघेणे प्रश्न
माझ्या बिछान्या भोवती
दात कोरत उभे राहते ते रात्री
आणि मला विचारते जाब
मी वाया घालवलेल्या त्याच्या
वर्षांचा.
=================
अभिजित अत्रे
3 comments:
मी प्रतिक्रिया काय देणार म्हणा..
सही आहे...नेहमीप्रमाणेच.
अप्रतिम !
'आयुष्य जाब विचारते' ही कल्पना चांगली आहे. फक्त ते "दात कोरत उभे राहते" हे जाब विचारायची पोझ वाटत नाही - पण असेली ती, काय सांगायचे त्याचे!
एक दोन शब्द खटकले ते नेहमी तसे वापरात नसतात म्हणून. उदाहरणार्थ: जन्मीन (जन्म घेईन); भूगा (भुगा)
काळाचा ह निर्घ्रुण प्रवाह! त्या अमोघ कालस्त्रोतातील एक चुळकाभर जल असंख्य जीवांना घेऊन ह्या क्षणी ह्या धरित्रीच्या किनरी लागले आहे. त्यातील एका अणूचेही मूल्य आपल्या जीवितास नाही. पुढच्या क्षणाचा विश्वास धरावा, तो कशाच्या आधारे? मागून येऊ घातलेली अनंत मन्वंतरे त्या कालस्त्रोताला रेटीत असतील.त्या प्रचंड दाबाने चंडवेग धारण करून वाहणारा हा कालप्रवाहाचा रेला किनारी लागलेले ते क्षणभंगूर अस्तित्व पुन्हा स्वत:मध्ये ओढून घेईल आणि खळाळत पुढे अतर्क्यात घेऊन जाईल. ते पाहण्यास उरणार नाही, ते आपण.
- अभिजीत रायरीकर
Post a Comment