संस्कृती रक्षकांनी विडा उचलला आहे
आणि आता ओतली जाणार आहे
काळी शाई, त्या संपादकाच्या चेहऱ्यावर
जमलच तर त्याच्या कुबट विचारांवर
तसा गुन्हा गंभीरच आहे त्या विद्वानाचा
दुखावल्या जाणारया सनातन भावनांचा
विचार न करता त्याने नको ते छापले
दोन घटनात म्हणे त्याला साम्य दिसले
पहिली घटना पनवेलची, रात्रीची, ओल्या पार्टीची,
मदहोश धुंदीची, डान्सबारची, गुंठा मंत्र्याची,
ज्याने उधळले काही करोड रुपये होऊन फिदा
नाचणाऱ्या बारबालेवर, जिच्या मधाळ होत्या अदा
दुसरी घटना पुराणाची, संस्कृतीची, देवांची,
राजा इंद्राची, अप्सरेची, महान साधूची
ज्याने ओवाळून टाकले त्याचे हजार वर्षाचे तप
त्या कामुक नर्तकीवर, जिने भंगले त्याचे जप
हा तर घोर अपमान आमच्या इतिहासाचा
ठेचायला हवा आता सडका मेंदू याचा
पण हाय, रस्ता पकडला त्यांनी घराचा
पटला त्यांना हा खुलासा संपादकाचा
"तुलना नाही केली मी पैशाची आणि तपाची
ठाऊक, गुंठा मंत्र्याला नाही सर विश्वामित्राची
दोस्तांनो, मला दिसलेले साम्य वेगळेच आहे
नाचणारी मेनका अजूनही शापितच आहे".
============
अभिजित अत्रे
===========

6 comments:
Great one! liked it.
I recommend you to visit this site below
http://www.maayboli.com/gulmohar
You will need to create your own account but after that you will be able to post your creations there.
I think you will get much more readership for your poems there.
samkalin sandharbh asalyane tumcha blog vachaniya zala ahe..
Thanks Amol. will create an account on Maayboli as suggested by you
a satiric glance at the morbidity of a set of people who without understanding the principle of humanism in our culture, crippled it through their mindless suppressing acts. Obviously a satire, but the impression it leaves on mind with 'Menka still cursed' reveals the true sensibility of your dejected mindset.
Another poem 'Parwe' is the finest retrospect of history and the silent repercussions of the process of peace and its perversion. Its an epic theme in miniature. And only being satirist it couldn't have been achieved its again the sensibility that makes a poet feel.......nice reading Sir.

mukund malve
सर सगळ्याच कविता भन्नाट आहेत. (Amazing या अर्थानी भन्नाट). या सर्व कवितांमध्ये वाचकाला स्वतःचा एक अर्थ काढायला जागा दिलेली आहे. आधी एकदा ब्लोग पहिला होता पण आज सगळ्या पोस्ट वाचून काढल्या. अजून अशाच पोस्ट्स च्या प्रतीक्षेत.
सुशांत कुलकर्णी
Post a Comment