कोणत्यातरी समरानंतर उडवली गेली होती
दोन शुभ्र कबुतरे, शांततेचा संदेश देणारी
बहुदा त्यांच्याच विजोड संभोगातून जन्माला
आलेत हे पारवे
त्यांचा वावर सिमित नाही राहिला
आता, दादरच्या कबुतरखान्या पुरता
घट्ट रोवले आहेत त्यांनी पंजे
आजूबाजूच्या चाळीत, वस्तीत, संस्थेत
गगनचुंबी इमारतीत, कचेरीत, दुकानात
आणि घराघरात
आत्ममग्न फिरत राहतात पारवे
कोनाड्या कोनाड्यातून, जोडीने,
कधी बसतात एका ओळीत, शिस्तीत,
टेलीफोनच्या वायरींवर, ठो आवाज झाला
कि दचकतात, सैरभैर उडतात, पुन्हा येवून बसतात
पूर्वीच्याच जागेवर, जसे बसले होते ते गेटवेवर,
बॉम्बस्फोटानंतर, पूर्वीप्रमाणेच प्रणयलीला करीत निरंतर,
आणि प्रस्थापित केली होती त्यांनी स्फोटापेक्षाही
भयंकर, शांतता
काही पारवे चुकून जन्मही देतात गरुडांना
पण त्यातील बहुतेकांना छोटा भासतो
हिमालय, उडतात आल्प्सकडे,
तिकडून पाठवतात नवे चावीष्ठ दाणे,
फेडू पाहतात खुज्या संह्याद्रीचे ऋण, दुरूनच,
शिव्या घालतात इथल्या बुरशी आलेल्या
खुराड्याना, गुबगुबीत मान फिरवीत चर्चा
करतात चकचकीत मॉल्स मधील घरट्यांची,
तुपट संस्कृतीची, आणि टंच श्रीमंतीची
काही त्यालाही उबतात, उद्विग्न होतात,
लढतात, परततात, पण त्यांचे मोठे पंख
टोचतात पारव्याना
काही गरुड इथेच थाबतात, उभी करतात
काही आनंदवने, वाळवंटातल्या ओयासीस सारखी
पण त्यांची संख्या खूप खूप कमी
खूप खूप पंख फडफडायला लागतात त्यासाठी
आणि बांधावी लागतात घरटी
लस्टर विरहित कडे कपारीत
काही पारवेही करतात तसा प्रयत्न,
सोडून देतात, अर्धवट,
नखे मोडतात इतरांच्या नावाने,
पंख मिटवून दाणे टिपत राहतात,
मेलेल्या पारव्याच्या नावाने,
देतात दोन चार दाणे, देणगी म्हणून,
ज्ञातीतील गरुडांना
उकिरडे पाहिलेकी डोळे मिटून घेतात
अंधार पडायच्या आधीच परतात, खुराड्यात
पकडलेच कुणा एकाला एखाद्या मांजरीने
तर चर्चा करतात, हळहळतात, नवस बोलतात, रडतात, मूक मोर्चा काढतात आणि असाह्य बसतात
चाळीतील वायरीवर, पण झुंडीने
टोची मारत नाहीत मांजरीला,
घू घू करत पुन्हा घुमत राहतात आपल्याच नादात,
प्रस्थापित करतात एक फक्त कुजबुजणारी
वांझ शांतता
हीच अलिप्त नीरवता अभिप्रेत होती का
त्या गुलाबवाल्या काकांना?
ज्यांनी उडवलेली ती दोन शुभ्र कबुतरे,
खरच ठाऊक नाही मला
पण ह्या स्मशानशांततेने उन्मळून पडलाय
सरकारी कचेरीतून नागवलेला एक म्हातारा
खाल्ल्या मिठाची शपथ देत,
काठी आपटत, ओरडून सांगतोय तो मला
कि या देशाला गरज आहे पुन्हा
एका युद्धाची!
==========
अभिजित अत्रे
========
दोन शुभ्र कबुतरे, शांततेचा संदेश देणारी
बहुदा त्यांच्याच विजोड संभोगातून जन्माला
आलेत हे पारवे
त्यांचा वावर सिमित नाही राहिला
आता, दादरच्या कबुतरखान्या पुरता
घट्ट रोवले आहेत त्यांनी पंजे
आजूबाजूच्या चाळीत, वस्तीत, संस्थेत
गगनचुंबी इमारतीत, कचेरीत, दुकानात
आणि घराघरात
आत्ममग्न फिरत राहतात पारवे
कोनाड्या कोनाड्यातून, जोडीने,
कधी बसतात एका ओळीत, शिस्तीत,
टेलीफोनच्या वायरींवर, ठो आवाज झाला
कि दचकतात, सैरभैर उडतात, पुन्हा येवून बसतात
पूर्वीच्याच जागेवर, जसे बसले होते ते गेटवेवर,
बॉम्बस्फोटानंतर, पूर्वीप्रमाणेच प्रणयलीला करीत निरंतर,
आणि प्रस्थापित केली होती त्यांनी स्फोटापेक्षाही
भयंकर, शांतता
उगीचच दोन पावले चालतात
बसल्या जागेवरून बुड हलवतात,
पुन्हा बसतात, वाट पाहतात
नेमाने मिळणाऱ्या दाण्यांची,
बोल लावतात भाग्याला पण
बंड करीत नाहीत जेव्हा
किराणा दुकानदार फेकतो समोर
कुजके धान्य, टिपत राहतात, झुंडीने,
शिटत राहतात दिवसभर राहत्या जागांवर,
तिथच करतात मैथुन,
शिटत राहतात दिवसभर राहत्या जागांवर,
तिथच करतात मैथुन,
आणखी एक पिढी वाढवतात
ऐदी परव्यांचीचकाही पारवे चुकून जन्मही देतात गरुडांना
पण त्यातील बहुतेकांना छोटा भासतो
हिमालय, उडतात आल्प्सकडे,
तिकडून पाठवतात नवे चावीष्ठ दाणे,
फेडू पाहतात खुज्या संह्याद्रीचे ऋण, दुरूनच,
शिव्या घालतात इथल्या बुरशी आलेल्या
खुराड्याना, गुबगुबीत मान फिरवीत चर्चा
करतात चकचकीत मॉल्स मधील घरट्यांची,
तुपट संस्कृतीची, आणि टंच श्रीमंतीची
काही त्यालाही उबतात, उद्विग्न होतात,
लढतात, परततात, पण त्यांचे मोठे पंख
टोचतात पारव्याना
काही गरुड इथेच थाबतात, उभी करतात
काही आनंदवने, वाळवंटातल्या ओयासीस सारखी
पण त्यांची संख्या खूप खूप कमी
खूप खूप पंख फडफडायला लागतात त्यासाठी
आणि बांधावी लागतात घरटी
लस्टर विरहित कडे कपारीत
काही पारवेही करतात तसा प्रयत्न,
सोडून देतात, अर्धवट,
नखे मोडतात इतरांच्या नावाने,
पंख मिटवून दाणे टिपत राहतात,
मेलेल्या पारव्याच्या नावाने,
देतात दोन चार दाणे, देणगी म्हणून,
ज्ञातीतील गरुडांना
उकिरडे पाहिलेकी डोळे मिटून घेतात
अंधार पडायच्या आधीच परतात, खुराड्यात
पकडलेच कुणा एकाला एखाद्या मांजरीने
तर चर्चा करतात, हळहळतात, नवस बोलतात, रडतात, मूक मोर्चा काढतात आणि असाह्य बसतात
चाळीतील वायरीवर, पण झुंडीने
टोची मारत नाहीत मांजरीला,
घू घू करत पुन्हा घुमत राहतात आपल्याच नादात,
प्रस्थापित करतात एक फक्त कुजबुजणारी
वांझ शांतता
हीच अलिप्त नीरवता अभिप्रेत होती का
त्या गुलाबवाल्या काकांना?
ज्यांनी उडवलेली ती दोन शुभ्र कबुतरे,
खरच ठाऊक नाही मला
पण ह्या स्मशानशांततेने उन्मळून पडलाय
सरकारी कचेरीतून नागवलेला एक म्हातारा
खाल्ल्या मिठाची शपथ देत,
काठी आपटत, ओरडून सांगतोय तो मला
कि या देशाला गरज आहे पुन्हा
एका युद्धाची!
==========
अभिजित अत्रे
========
10 comments:
Nice Blog..
What a poem!
Had watched common pigeons hundred times..but had never thought to draw a parallel between them and men and then camouflage it with the two-three generations of self centric people born in the post independence era. One never realizes when the descriptions of pigeons ends and when you start referring to something else till one figures out Gandhi stressing the need for a yet another war. Had to read two three times to understand it but it was worth it, beautifully written.
छानच ... मस्त..
" काही त्यालाही उबतात, उद्विग्न होतात,
लढतात, परततात, पण त्यांचे मोठे पंख
टोचतात पारव्याना "
ह्या ओळीं साठी स्पेशल धन्यवाद !
....लस्टर विरहित कडे कपारीत
.....ज्ञातीतील गरुडांना
....कुजबुजणारी वांझ शांतता
Ya tin oli lai bhari. Abhya, ase lihit rahilas tar sahitik banane avghad nahi tula. good work. chalu theva. Mayur Joshi
Ha ha.. Mayur, dhanyavad pan sahitik honyasathi shudhalekhan lagte (ithe tyachi bomb aahe). ani, marathi typing yet nahi ajun, he atta lihito aahe tase lihito ani google transletarvar ek ek shabda marathit karun gheto. Marathi typing far avghad aahe baba ani tyasathi prayatna karayala vel hi nahi sadhya. asech matra lihane suru thevto. tumche laksha asudya.
Abhijit ,
For "devnaagri" typing you could use barah or gamabhana editors.
Otherwise you could type online on blogspot editor by pressing "aa" button of editor. Also choose hindi in the settings for the blog.
Let me know if you need any help. Its very easy and convenient.. will save lot of your time... also you will start liking it eventually !!
Sir tumchya blog var updatechi vat pahat asto. 'Parave' asvastha karnari ahet.
thanks a ton Veedee. Saw gamabhana, look grt. yet to go into deails. will see others too. If needed, will seek your help. thanks for the info which will be of grt help to me. have a good day. warm regs. abhijt atre.
Awesome! Liked it even better than the other one.
Thanks Amol for your words of support
Post a Comment