Tuesday, April 5, 2011

अंधार.

अंधार...
सूर्य उगवला कि अंधार
संपतोच असे नाही
तसा काही नियम नाही
पुष्कळदा तो चालतो
त्या सहस्त्ररेश्मिच्याच संगे
त्याचे तळपते किरण धरून
आणि अलगद उतरतो
कोठेतरी ऊन्हकळा लागून
मारणाऱ्याच्या मिटत्या पापणीत.

अंधार...
कधी कधी उफाळून वर येतो
खोल खोल पाताळातून
भूकंप बनून
तुस्मानी लाटांवर स्वार होऊन
आणि घनघोर बरसतो
ज्वालामुखीच्या धगेतून.

अंधार...
भाजून काढणाऱ्या ग्रीष्मात
तो चोरपावलांनी शिरतो
सावकारी कर्ज थकलेल्या
एखाद्या शेतकऱ्याच्या झोपडीत
आणि बसतो दबा धरून
कीटकनाशकाच्या बाटलीत
किवां लपेटतो स्वतःला
दावाच्या दोरात.

अंधार...
न्हातो काळ्या सडकांन सोबत
झिरपतो उन उन डांबरावरती
कधी फसफसून सांडतो बाहेर
करकचून दाबल्या जाणाऱ्या ब्रेकमधून
आणि अवचित प्रकटतो
एखाद्या व्हराडाच्या टेम्पोसमोर

अंधार...
बेमालूमपणे मिसळतो तो
रेल्वे इंजिनाच्या आवाजात
आणि घेऊन जातो संगे
रूळावरची काही बेसावध गाणी.

अंधार...
कितीही दिवेलागण केली
तरी तो संपत नाही
कारण
अंधार आहे एक
अपरिहार्य देण
प्रकाश भोगण्याच. 
============
अभिजित अत्रे
============

6 comments:

Mihir said...

khup vegli ahe. Awadli. Pramukhyane Shetkari. Bhannat ani touching.

Prasad Arun Kulkarni said...

aaj weekly meeting la jayachi prerana milali ya kavite mule. Baher itka andhar aahe tya manane weekly meeting kahich nahi asa vatala :-)

(Aso: Changli aahe Kavita. Last para, tyatlya tyat last three lines best aahet.)

अंधार आहे एक
अपरिहार्य देण
प्रकाश भोगण्याच... best !!!

Anonymous said...

great. especially the reference to railway track and farmer suicides. Was the Tuesday meeting so terrible????? or shall I say so inspiring? Manjiri

atre-uvach said...

मंजिरी//प्रसाद , मंगळवारच्या मीटिंग मध्ये जो काही ज्ञानाचा प्रकाश पडतो त्या पेक्षा बाहेरचा अंधार परवडला!!!
बोधी वृक्षाच्या छायेत बुद्धाला जे ज्ञान्दर्शन झाले ते पण या ज्ञानप्रकाशा पुढे फिक्के आहे.
मी तर काही दिवसांनी बुद्ध होणार आहे. (भगवान बुद्ध नाही झालो तरी हतबुद्ध नक्कीच होऊ)!.
अभिजित

Anonymous said...

wow...

saglyat important...
hi kavita kalali... without much efforts.. I'm improving :)
it's touching and very timely...

swati

Umesh Isalkar said...

Appratim kavita .... !