Saturday, January 29, 2011

गझल: आजचे सिंहासन


कोणीच गात नाही अजून भूपाळी कशी
सूर्य उगवूनही पहाट अजून काळी कशी

अंधार पिऊन सारा विझतो रोज एक तारा
राजधानीत चालली अजून दिवाळी कशी

धान्न्याने तुंबलेली कोठारे सडून गेली
वंचितांना चिंता पोटाची अजून जाळी कशी

त्यांच्या भरझारी वस्त्रांसाठी झालो आम्ही नागडे
कोणीच इथे पेटवेना अजून होळी कशी

शिक्षा शिरच्छेदाची केव्हाच ठोठावाली त्यांना
वाजेना तरी  राजाची अजून टाळी कशी

गल्लोगल्लीतून फिरती रॅंडचे वंशज सारे
बंदुकीतून सुटली नाही अजून गोळी कशी

मुजोर गार्द्यानी खूप पूर्वीच वार केले
तख्तातून नारायणाची अजून किंकाळी कशी

सिंहासना भोवती घुटमळती ही कुत्री कशी
फोडली नाही वाघाने अजून डरकाळी कशी
======
अभिजित अत्रे
======

5 comments:

Anonymous said...

Wonderful poems both this and tichi chalishi. Hope you are preserving them carefully and are thinking of releasing a book.
manjiri

Anonymous said...

wawa, surya ugvunhi pahat kali.... intense...jitendra

sewaks said...

हे बेस्ट आहे. तुझा हा पैलू माहित नव्हता. अल्पना

umesh said...

Sir, Chhan zali aahe.. a few subtle indications like Andhar pivun saara vizato roj ek taara adds to the richness of the poem.... Atres' take to satirical verse like a fish to water... !

MIhir said...

Mast. Gazalkar Atre aiwaji GAZANI Atre.