Monday, January 24, 2011

तिची चाळीशी..

पापणीआड आज माझ्या
तोच टपोरा थेंब आहे
गहिवरून सांग पुन्हा रे
तुझे माझ्यावर प्रेम आहे

मुलांचीही संपली शाळा
चिमण्या उडणार रे भूर
भोवताली केवढा गोतावळा
तरी मन जाते दूर

छंद नोकरी आहे रे तशी
माझाही संपतो दिवस पटदिशी
रेशमाची बोचते पण ही उशी
हवी वाटते फक्त तुझी कुशी

सग्गळे सग्गळे दिलेस मला
घर आहे, गाडी आहे
मागे वळून बघ तरी
ल्याले तुझी पहिली साडी आहे

सहल नको हॉटेल नको
मल्टीप्लेंक्सची गर्दी नको
विकतच्या सुखाची आता
सोन्याचीही साखळी नको

वाढदिवसाला नको हारतुरे
अत्तराचा आता गंध सले
रुमालात लपव पुन्हा रे
सोनचाफ्याची दोन फुले

भरभरून बोल ना रे
मिठीत उचलून तोल ना रे
रस्ता ओलांडताना पुन्हा
माझा हात धर ना रे

स्वप्नांच्या पलीकडे जाता
नकोत नवीन शपथा आता
समुद्राच्या गाजे संगे
पुन्हा होऊदेत अस्पष्ट बाता

पापणीआड आज माझ्या
तोच टपोरा थेंब आहे............

7 comments:

Snehal said...

sir, this is such a touching peom..... soooo beautiful... absolutely loved it. You've written from ur heart. I loved the line 'rasta olandtana punha, majha haat dhar na re'.

rupa said...

Hi Abhijeet
It was a grt surpise. we were not aware that our friend is so talented. kavita sunder aahe and now that we all friends are more or less in same phase of life asa wattala aplya manatlach aahe ka he? anyways asyach sunder sunder kavita kar and we will read enjoy reading them. Bye.....

umesh said...

sir, kavita faarch chhan zali aahe...papani aad aaj punha toch tapora themb aahe....! Wah Wah ...! bahot khub....jiyo!

Prasad Arun Kulkarni said...

Sundar !!!

Anonymous said...

Umesh chya bhashetach sangayche zhale tar Ek Number... Every word of this poem presents a true to life picture... apparently this cannot be the end of the poem...there is scope for more of the very same poem.... we all are waiting... punha Ek Number...

manish

Anonymous said...

बढिया सर..... लगे रहो... चाळीशीची जाणीव व्हायला लागली तर..चांगले आहे... फक्त कवितेत नको, प्रत्यक्षातही ती जाणीव हवी आपल्याबद्दल आणि आपल्यांच्याबद्दलही.....
पराग

Anonymous said...

Khupach chhan, touching peom..........too good