Saturday, April 24, 2010

सूर्य

खोल खोल दरीतील काताळावर
बसले होते काही कवि काजवे
चर्चा करीत होते मिळालेल्या टाळ्यांची
आणि न मिळालेल्या राज्य पुरस्कारांची

मीही झालो त्यात सामील
आणखी एक काजवा होऊन
आमच्यात झाले काही गट
पडले काही वैचारिक तट

माझ्या गटातल्या एकाला
दुसरा "'यमक्या" म्हणाला
आणि सुरु झाले भांडण
एक न संपणारे कांडण

अंधार बुडल्या दरीत
जेव्हा मिटले आमचे प्रकाश
त्येव्हा तो आला
त्याच्या सात घोड्यांवरून उतरून
मनुष्यरुपात.

"तुम्ही कुठे होता?
आमचे प्रकाश संपले ना?," आम्ही
"मी इथेच होतो मित्रानो
तुम्ही माझे बोट सोडलेत" तो म्हणाला.

"भांडू नका बाळानो
अजून दरी पार करायची आहे
मग डोंगर, मग हिमालय
मग जमले तर आकाश
खूप सूर्य आहेत तिथे
माझ्याहून ही मोठे
तुमच्या देहू आळंदी इतके जुने
थोडे त्यांच्याकडे पहायाला शिका
इतके नका आत्ममग्न होऊ,"

एवढे सांगून तो उठला
एक अग्निगोल होउन् झेपावला
त्याचा रथ आकाशगंगेवर स्वार होताना
सोनेरी तेजाचे काही पुंजके सांडले दरीत
आणि उडाली एक झुंबड
ते कवडसे गोळा करण्यासाठी
पुन्हा प्रकाशित होण्यासाठी
स्वयंप्रकाशित म्हणून मिरवण्यासाठी

त्यातलेच काही सूर्यकिरण वेचताना
मी सहज वर पहिले
माझ्या काजव्याच्या डोळ्यांनी
तेव्हा त्त्या तप्त लोहगोलावर
कोरलेली दिसली
पाच अक्षरे
कु ... सु.. ... मा.... ग्र.... ज
=============
अभिजित अत्रे
================

10 comments:

Anonymous said...

Atre Surya khupach chhan. Ani Rajasa...tar farach chhan. Keep it up. Pan dohamadhe punha jaau naka. Manjiri

Parag Karandikar said...

atre, bahot badhiya. Lage raho

. said...

रा. रा. अभिजितराव,
आपणांस मराठीत लिहावेसे वाटले व सूर्य वगैरे उगवतोय तुमच्या वर्डप्रोसेसरातून हे छानच.
लिहिते राहा...

ब्लॉगची लिंक कळते-समजतेवर देतोय.
- बापू

Umesh Isalkar said...

wah wah ...farach chhan kavita !

Anonymous said...

Thanks
Manjiri, Parag, Bapu and Umesh. Your words of encouragement are always of great help. Pls continue to comment. thanks again.
Abhijit

manish said...

a bit difficult to understand...there's a deep thought though...

the Bhalerao said...

ज्या कुसुमाग्रजांबद्दल तुम्ही इतकी कळवळून कविता केलीत त्यांची प्रसिद्ध "जालियनवाला बाग" ही कविता पाठ्य पुस्तकातून नुकतीच काढण्यात आली. कारण त्यातली एक ओळ "अन येशू एक नवी जखम तुझ्या ह्रदयात" ह्यात ख्रिश्चनांचा अपमान होतो असे महाराष्ट्र सरकारला वाटले.
सरकारांनी कविता वाचूच नयेत असा ह्याचा अर्थ !तुमची कविता वाचून सरकार म्हणेल, पहा यंदा उन्हाळा ज्यास्त आहे कारण सूर्यावर "कुसुमाग्रज" आहेत. खोटे वाटते का ? अत्र्यांची वरील कविता वाचा !

macrothescribe said...

atre kavita farach sunder jhali ahe pan kusmagrajanche rupak matra tevdhe kadhun taka tyachi kahi garaj nahi te ekhadya apendix sarkhe watate

manish said...

we are missing something..find time to write...there is lot happening ... your valuable comments are awaited......
manish

ashishchandorkar said...

अत्रे बुवा मस्तच... एकदम भारी वाटलं वाचून... असंच नवनवीन वाचायची इच्छा आहे.