Friday, December 14, 2012

गझल:-- ग्यांगवॉर

प्रेमावर अनेकांनी खूप गझल लिहिल्या आहेत. दोस्त म्हणाला तू  एखाद्या रुक्ष विषयावर-- पुण्यात , पिंपरीत, मुंबईत होणाऱ्या टोळीयुद्ध, मारामारी, इत्यादी.. इत्यादी विषयांवर -- गझल लिही. त्याच्यासाठी.... 
==============================
गंजून गेले भाले, म्यान तलवार झाली
जरीपटके झाले ओले, आज कोयत्यास धार झाली

बूरूज ढासळून पडले, तोफ आता गार झाली
दगडी चाळीत जे दडले, त्यांचीच चर्चा चिकार झाली

पुस्तकात  लपवलेल्या  पिस्तूलाची, कहाणी आता बेकार झाली
काल मावळात गावठी कट्ट्यांची, विक्री बेसूमार झाली

ही वाट काळोखाची, जिंदगी जूगार झाली
ही न युद्धे वीरांची, गल्लीत शिकार झाली

संगे कोणी ना आला, गर्दी हुशार झाली
थोडा अंधार काय झाला, सावलीही पसार झाली

या शहरातील पांडवांची, वस्ती का लाचार झाली?
इथे शमीच्या झाडांची, कत्तल फार  झाली  
==========
अभिजित अत्रे

11 comments:

Mihir Tanksale said...

पुस्तकात दडवलेल्या पिस्तूलाची, कहाणी आता बेकार झाली....great. Khup arth ahe yala. Best.

subhash sonawane said...

I liked entire 'Gazal'. Line I liked most is 'Thoda andhar kay zala, savalihi pasar zali' Great

Tulip :A conversation with the self said...

in few lines the whole gamut of our lives expressed against the backdrop of the greater past..indeed great sir!!!

Abhijit Rayarikar said...

बहोत खूब!

असेल शार्प शूटर तो भारी, खतरनाक त्याची टोळी
मात्र चुकवू शकणार नाही, तोही भाळी लिहीलेली गोळी

भरतील रकाने बातमीने, येतील वाचकांची पत्रे
गजल मार्मिक करू जाणे, तो एकच अभिजित अत्रे!

Umesh Isalkar said...

mastach ....!

Umesh Isalkar said...

mastach ....!

Ninad Kulkarni said...

फारच उत्तम लिहिले आहे
शब्दाशब्दातून अनेक घटना डोळ्यासमोर तरळल्या..

So called.....Rajendra Biniwale said...

nice ....

abhay narhar joshi said...

बहोत खूब!

Niranjan Medhekar said...

mast sir 1 number

Tulip :A conversation with the self said...

true sir,,shadow too eludes in dark,,,your ironies intuitively give us treasures hidden inside us,,,real gist!!!