Thursday, June 28, 2012

शनिवारच्या आषाढी एकादशी निमित्त

विरक्तीच्या संगे  | आसक्तीचे दंगे
अजून खेळ रंगे । संसाराचा

जन्म फिटेना |  व्यवहार मिटेना
मोह सुटेना      |  प्रपंचाचा

म्हणून आज तुला | लावतो बोल
काळीज खोल | थरारते

उभी तुझ्या दारी | दुष्काळाची वारी
तरी का  पंढरी । कोरडीच

करतात चैन । ज्यांनी केला गुन्हा
कपिलेचा पान्हा । आटलेला

तुला का  येईना । आमचा कळवळा
मातीलाही उमाळा । फुटलेला

आम्हीच का नेहमी । द्यायची परीक्षा
करावी प्रतीक्षा । सुखाची

उभ्या दारिद्र्याचा । मागू आज जाब
ठेव थोडी आब । भक्तांची

नको नुसती भेट । थरारु दे विट
हो आता  प्रगट । पावसात

नाहीतर तोड । जगण्याचे पाश
पापणीआड आकाश । ओथंबले
==============
अभिजित अत्रे

10 comments:

Mihir... said...

Atre Uvach.,.Khup diwsani wachun mast watala. Farach sundar zaliye. Varunraja he wachun 'Dry Day'la nakkich barasnar....

Radhe said...

Khup sundar, shevatche kadve apratim

manish umbrajkar said...

पांडुरंगाला केलेली विनवणी ... अगदी आर्त स्वरूपात प्रकट झालीये ....पाऊस पडला तर वारकर्यांना आणि सगळ्यांनाच पांडुरंग भेटीचा आनंद होयील एकादशीला .... सुंदर
manish

Ashish said...

अत्र्यांचे शब्द असे अभिजात
ताकातून जसे निघे नवनीत

ज्ञानाच्या या सूर्या, प्रतिभेचा प्रकाश
आकांक्षापुढती जिथे ठेंगणे आकाश...

ह. भ. प. श्री अभिजीत महाराज अत्रे यांना साष्टांग दंडवत...

फारच मस्त जमून आलंय..

Umesh Isalkar said...

faarch chhan ....last lines subtly sum it up...or in the words of Mr Malve. Last lines are consummation of human longing for rains. It also, in a way, epitomizes the eternal longing for communion with the divine powers..!

Tulip :A conversation with the self said...

पापणीआड आकाश । ओथंबले
really an ardent prayer! a slight tinge of sarcasm or to better term it wrath against the unceasing anguish at the gate of the divine.

Sushant Kulkarni said...

अशक्य सुंदर. तुम्ही त्याला हक्काने जाब विचारला खरा. पण त्याला आजकाल कमी ऐकू येतं म्हणे.

Parag Karandikar said...

नको नुसती भेट । थरारु दे विट
हो आता प्रगट । पावसात

नाहीतर तोड । जगण्याचे पाश
पापणीआड आकाश । ओथंबले

वा... वा... क्या बात है....

Mohsin Mulla said...

ekadashi special chhan..

Mohsin Mulla said...

ekadashi special chhan..