Thursday, March 10, 2011

हट्ट कशासाठी?

रोज रोज जिंकण्याचा हट्ट कशासाठी?
रोज रोज धावण्याचा हट्ट कशासाठी?

रानातल्या वेलीवर फुलपाखरू येवून बसले
घरात गुलाब फुलवण्याचा हट्ट कशासाठी?

फांदीवरील पाखरू, शीळ घालून गेले
ते पिंजऱ्यात कोंडण्याचा हट्ट कशासाठी?

पौर्णिमेचे चांदणे रात्री घरभर झरले
आता चंद्र तोडण्याचा हट्ट कशासाठी?

डहाळीचा मोहर मुळांनी पाहिलाही नाही
हा  श्रेय लाटण्याचा हट्ट कशासाठी?

डोंगरातला झरा नदीत झाला रिता 
सगळे शिगोशीग भरण्याचा हट्ट कशासाठी?

शर्यतीतले घोडे गोळी खाऊन मेले
उर फुटेस्तोवर धावण्याचा हट्ट कशासाठी?

कालचे तुझे सु:ख  झाले-कुठे जुने?  
नवे दुख: शोधण्याचा हट्ट कशासाठी?
=============
अभिजित अत्रे
===============

4 comments:

Mihir said...

The best.....

Anonymous said...

nehmich awghad, dokyavarun janarya
kavita lihinyacha hatta kashyasathi?

kadhitari ashya hi simple and sweet kavita
barya vatatat... :)

sahiii ahe ekdum..

swati

Snehal said...

mast mast mast... like swati said, amhala jhhepnarya kavita pan liha adhun madhun.. on public demand, we want the next one to be humor peice...

चारु said...

शेवटच्या दोन ओळी मस्त आहेत. आणि खऱ्या आहेत. माणूस कितीही आनंदी असला, तरी त्या आनंदात सुध्दा दु:ख शोधत रहातो. त्यामुळे कधीच तो समाधानी राहु शकत नाही, बरोबर ना? छान आहे कविता..