विरक्तीच्या संगे | आसक्तीचे दंगे
अजून खेळ रंगे । संसाराचा
जन्म फिटेना | व्यवहार मिटेना
मोह सुटेना | प्रपंचाचा
म्हणून आज तुला | लावतो बोल
काळीज खोल | थरारते
उभी तुझ्या दारी | दुष्काळाची वारी
तरी का पंढरी । कोरडीच
करतात चैन । ज्यांनी केला गुन्हा
कपिलेचा पान्हा । आटलेला
तुला का येईना । आमचा कळवळा
मातीलाही उमाळा । फुटलेला
आम्हीच का नेहमी । द्यायची परीक्षा
करावी प्रतीक्षा । सुखाची
उभ्या दारिद्र्याचा । मागू आज जाब
ठेव थोडी आब । भक्तांची
नको नुसती भेट । थरारु दे विट
हो आता प्रगट । पावसात
नाहीतर तोड । जगण्याचे पाश
पापणीआड आकाश । ओथंबले
==============
अभिजित अत्रे
अजून खेळ रंगे । संसाराचा
जन्म फिटेना | व्यवहार मिटेना
मोह सुटेना | प्रपंचाचा
म्हणून आज तुला | लावतो बोल
काळीज खोल | थरारते
उभी तुझ्या दारी | दुष्काळाची वारी
तरी का पंढरी । कोरडीच
करतात चैन । ज्यांनी केला गुन्हा
कपिलेचा पान्हा । आटलेला
तुला का येईना । आमचा कळवळा
मातीलाही उमाळा । फुटलेला
आम्हीच का नेहमी । द्यायची परीक्षा
करावी प्रतीक्षा । सुखाची
उभ्या दारिद्र्याचा । मागू आज जाब
ठेव थोडी आब । भक्तांची
नको नुसती भेट । थरारु दे विट
हो आता प्रगट । पावसात
नाहीतर तोड । जगण्याचे पाश
पापणीआड आकाश । ओथंबले
==============
अभिजित अत्रे