Monday, February 7, 2011

गझल गाणे:: घर पत्यांचे कोसळाया...

घर पत्यांचे कोसळाया लागती कुठे बहाणे
तुझ्या नाकारावरी मांडीले मी  कुठे गार्‍हाणे?

पैशात भावनेस तू तोललेस जेव्हा
तेव्हा उमगे मनास माझेच खोटे नाणे

सोडून हात माझा गेलीस तू  कुठे  दूर
आठवे मला तरीही  तुझे मागे वळून पहाणे

आपल्या भेटीचे मीही ठेविले कुठे पुरावे
पसंत नव्हते तुलाही माझे झुरत रहाणे

मिटणारच होती वाळूवरची ती ओली पाऊले
साक्ष देण्याइतुके कुठेग  नारळीचे ते झाड शहाणे?

तुटणारच हा म्हणती जनही शब्द जीवघेणे
ओठावरी तरीही माझ्या फुलले नवीन गाणे

घर पत्यांचे कोसळाया.. 
========
अभिजित अत्रे
==========